महाविकास आघाडी मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:43+5:302021-01-08T04:30:43+5:30

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब ...

Mahavikas Aghadi will contest Manchar Gram Panchayat elections | महाविकास आघाडी मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक लढणार

महाविकास आघाडी मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक लढणार

मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे, मंगेश बाणखेले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, साईनाथ पतसंस्थेचे संचालक युवराज बाणखेले, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, उद्योजक अजय घुले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, योगेश बाणखेले, मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले, माजी उपसरपंच धनेश मोरडे, अरुण लोंढे, नासिर शेख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र शहा म्हणाले, मंचर ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मंचर ग्रामवासीयांसाठी लवकरच नगरपंचायतीची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने केली जाणार आहे. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. मंचर गावच्या एकोप्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या वतीने मंचर ग्रामपंचायतीची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेस आय पक्षाच्या वतीने एकत्रितपणे लढवून विकासकामे केली जाणार आहेत, अशी ग्वाही शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली. या वेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आणि माजी सरपंच दत्ता गांजाळे यांची भाषणे झाली.

दरम्यान, काँग्रेस आय पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मंचर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रकिया सुरु असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आघाडी केली आहे. महाविकास आघाडीचा पक्ष म्हणून काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत व्यक्तीशी कोणतीही चर्चा केलेली नाही. आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष यांची असून काँग्रेस आय पक्षाचा कोणताही सहभाग नाही. महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या चर्चेत काँग्रेस आय पक्षाला सहभागी करुन घेतले जात नाही. काँग्रेस आय पक्ष महाविकास आघाडीच्या निर्णयात सहभागी होत असताना आंबेगाव तालुक्यात मात्र काँग्रेस आय पक्षाला सामावून घेतले जात नसल्याने काँग्रेस आय पक्षाचा आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीशी संबंध नसल्याचे काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahavikas Aghadi will contest Manchar Gram Panchayat elections