शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

राज्याआधीच वडगाव मावळ नगरपरिषदेत ''महाविकास आघाडी ''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 8:16 PM

राज्यात महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देसहा समितीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेची वर्णी

वडगाव मावळ : राज्यात महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. त्याचे पडसाद तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ नगरपंचायतीत विविध विषयक समितीच्या निवडणुकीत उमटले. सर्व सहा समितीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेची अध्यक्षपदी वर्णी लागली. भाजपाला एकही सभापतिपद मिळाले नाही. भाजपाचे दोन उमेदवार पराभूत झाले. विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक गुरुवारी झाली. गेल्यावर्षी समित्यांची निवडणूक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने भाजपाला मदत केल्याने भाजपाला तीन समितीचे सभापतिपद मिळाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके विजयी झाले. शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन्ही गटाला एकत्र केल्याने या वेळी भाजपाला एकही सभापतिपद मिळाले नाही.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन बर्गे, सहायक निवडून निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. स्वच्छता व आरोग्य समितीची निवडणूक झाली़ राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र कुडे यांना ३ मते तर भाजपाचे दिनेश ढोरे यांना २ मते मिळाली़ कुडे विजयी झाले. नियोजन समितीची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजीत वाघमारे यांना ३ तर भाजपचे किरण म्हाळसकर यांना २ मते मिळाली़ या दोन्ही समितीच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. नगरसेवक सुनील ढोरे, राजेश बाफना, विशाल वहिले, प्रवीण ढोरे, सुनील शिंदे, शरद ढोरे, अमर चव्हाण आनंदोत्सव साजरा करण्यात आला.राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, त्या आधीच वडगावमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे........* सार्वजनिक बांधकाम खाते सभापती : पूनम जाधव, सदस्य दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, माया चव्हाण, प्रमिला बाफना़ * शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य  सभापती : सायली म्हाळसकर (मनसे), सदस्य अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रमिला बाफना, पूजा वहिले. * पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती  सभापती : राहुल ढोरे, सदस्य अर्चना म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले. * नियोजन व विकास समिती सभापती : चंदजीत वाघमारे, सदस्य किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले. * स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती  सभापती : राजेंद्र कुडे, सदस्य दशरथ केंगले, अर्चना म्हाळसकर, प्रमिला बाफना, माया चव्हाण. * महिला बालकल्याण सभापती : शारदा ढोरे, सदस्य दीपाली मोरे, सुनीता भिलारे, प्रमिला बाफना, माया चव्हाण. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना