Maharashtra HSC Results 2021: पुणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.७२ टक्के; मुळशी तालुक्याने मारली बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 09:23 PM2021-08-03T21:23:30+5:302021-08-03T21:30:07+5:30

Maharashtra HSC Results 2021: मुळशी तालुक्याचा ९९.७२ टक्के निकाल : खेड तालुका दुसऱ्या तर पुरंदर तिसऱ्या क्रमांकावर 

Maharashtra HSC Results 2021: Pune district's 12 th result is 99.72 percent; Mulshi taluka first | Maharashtra HSC Results 2021: पुणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.७२ टक्के; मुळशी तालुक्याने मारली बाजी 

Maharashtra HSC Results 2021: पुणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.७२ टक्के; मुळशी तालुक्याने मारली बाजी 

Next

पुणे : Maharashtra HSC Results 2021: पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याने बारावी परीक्षेचा निकालात (९९.९५ टक्के) बाजी मारली आहे. खेडचा (९९.९३ टक्के) दुसरा  तर पुरंदर तालुक्याला तिसरा (९९.९२ टक्के) क्रमांक मिळाला आहे. तर सवार्त कमी जुन्नर तालुक्याचा (९८.६० टक्के) निकाल लागला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडचा निकाल ९९.८६ टक्के, पुणे शहर पूर्वचा ९९.८१ टक्के तर पुणे शहर पश्चिमचा निकाल ९९.७९ टक्के निकाल लागला आहे. पुणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.७२ टक्के लागला असून यामध्ये मुली अव्वल आल्या आहेत.

कोरोनामुळे यंदा बारावी परीक्षेचा निकाल सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल जाहीर करण्यात  आला आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
----
जिल्ह्याचा टक्केवारीनुसार तालुकानिहाय निकाल

०१) मुळशी तालुक्यातून २ हजार २७५  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार २७४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.

०२) खेड तालुक्यातून ४ हजार ३६६  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ३६३ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.९३ टक्के लागला आहे. ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०३) पुरंदर तालुक्यातून २ हजार ७१२ परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ७१० विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. २ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.

०४) मावळ तालुक्यातून ३ हजार ६९२  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ६८८ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.८९ टक्के लागला आहे. ४  विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०५) बारामती तालुक्यातून ७ हजार ३१३  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ३०४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.८७ टक्के लागला आहे. ९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०६) भोर तालुक्यातून २ हजार १० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ०७ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.८५ टक्के लागला आहे. ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०७) दौंड तालुक्यातून ३ हजार ९८२  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ९७५ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.८२ टक्के लागला आहे. ७ विद्याथी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०८) वेल्हा तालुक्यातून ४४९  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४४८ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.८१ टक्के लागला आहे. १ विद्याथी अनुत्तीर्ण झाला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे,

०९) आंबेगाव तालुक्यातून २ हजार ५७० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ५६४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.७६ टक्के लागला आहे. ६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१०) हवेली तालुक्यातून ९ हजार ८९८  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ८७३ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.७४ टक्के लागला आहे. १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

११) शिरूर तालुक्यातून ५ हजार २४७  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार २१४ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.३७ टक्के लागला आहे. ३३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.

१२) इंदापूर तालुक्यातून ५ हजार ५१७  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ४६४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९९.०३ टक्के लागला आहे. ५३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

१३) जुन्नर तालुक्यातून ४ हजार ९५३  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ८८४ विद्याथी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात सवार्त कमी निकाल ९८.६० टक्के जुन्नरचा लागला आहे. ६९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
-------

महापालिका क्षेत्रात पिंपरी-चिंचवड ठरले अव्वल

०१) पिंपरी-चिंचवड शहरातून १६ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १६ हजार ४५१ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.८६ टक्के लागला आहे. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. २३ विद्याथी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०२) पुणे शहर पूर्व भागातून २१ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार १५६ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.८१ टक्के लागला आहे. ३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

०३) पुणे शहर पश्चिम भागातून २६ हजार ३६०  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २६ हजार ३०५ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.७९ टक्के लागला आहे. ५५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 


 

Web Title: Maharashtra HSC Results 2021: Pune district's 12 th result is 99.72 percent; Mulshi taluka first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.