शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून हकालपट्टी करा :  शिवसेनेची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 14:30 IST

बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झालेले भाजपाचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून तडकाफडकी हकालपट्टी करा...

ठळक मुद्देशिवसेना - भाजपा महायुतीत देशमुख यांनी भाजपातून बंडखोरी

खेड : बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झालेले भाजपाचे गटनेते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांची भाजपातून तडकाफडकी हकालपट्टी करून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.     खेड - आळंदी विधानसभा मतदार संघातून सुरेश गोरे हे सलग दुसऱ्यांदा ही निवडणूक लढवत असून, गोरे हे शिवसेना - भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार असतानाही या निवडणुकीत देशमुख यांनी भाजपातून बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपाने कारवाईचा बडगा उगारून देशमुख यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली. मात्र, त्यांना पाठबळ देण्यासाठी शरद बुट्टे हे उघडपणे देशमुख यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बुट्टे पाटील यांची पक्षाने सखोल चौकशी करून तातडीने हकालपट्टीसह त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवेसेनेच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. शिवसेनेच्या या बैठकीला सेनेचे जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके, जिल्हा उपप्रमुख शिवाजीराव वरपे, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे आदींसह सेनेचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.    माऊली कटके यावेळी म्हणाले," युती धर्म न पाळता बुट्टे पाटील यांच्यासह भाजपाचे अन्य कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारीही बंडखोर उमेदवार देशमुख यांच्या प्रचारात उघडपणे सहभागी झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांची हकालपट्टी करून त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई होणे अपेक्षित आहे." वरील उपस्थितांनीही यावेळी या प्रकाराचा जाहीर निषेध केला

टॅग्स :KhedखेडBJPभाजपाAlandiआळंदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण