Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:48 PM2019-10-14T12:48:20+5:302019-10-14T12:49:00+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक नकारात्मक राजकारणामध्ये अडून पडले ..

Maharashtra Election 2019 : Development focus main power of bjp : Raosaheb danve | Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे 

Maharashtra Election 2019 : विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान : रावसाहेब दानवे 

Next
ठळक मुद्देभाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी बाणेर येथे जाहीर सभा

बाणेर : नकारात्मक राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक अडून पडले असताना भाजपने गल्ली ते दिल्ली सर्वच स्तरांवर विकासाचा अजेंडा यशस्वीपणे राबवला आहे़ विकासाचा अजेंडा हेच भाजपचे बलस्थान असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले़ 
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी बाणेर येथील जाहीर सभेत ते बोलत होते़ यावेळी स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते़ 
या वेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना बाहेरचा उमेदवार म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वत:च्या नेतृत्वाकडे देखील पाहिले पाहिजे़. वायनाड मतदारसंघामध्ये जाऊन निवडणुका लढविल्या आहेत, बाहेरच्या मतदारसंघात निवडणुका लढण्याची काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसह सर्वच विरोधक केवळ नकारात्मक मानसिकतेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडे विकास प्रकल्पांवर अजेंडा नाही. ते फक्त मोदी-शहा आणि फडणवीस यांच्यावर टीका करीत कांगावखोर भाषणे करीत आहेत. त्यामुळेच जनतादेखील विकासाभिमुख भाजप महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, वाढत्या संख्येने झालेल्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये शहरी आणि निमशहरी भागांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधांचे जाळे विकसित करण्यावर आमचा भर असेल़ या कार्यक्रमास खासदार गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.
......
माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, तसेच कोथरूड मतदारसंघाचे माजी मनसे विभागप्रमुख विनोद मोहिते यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला़ तसेच, रावसाहेब दानवे यांचे भाषण सुरू असताना बाणेर येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांचे बंधू मारुती चांदेरे, बाजीराव चांदेरे, मयूर चांदेरे यांनी व्यासपीठावर येत भाजपमध्ये प्रवेश केला़ 

Web Title: Maharashtra Election 2019 : Development focus main power of bjp : Raosaheb danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.