शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा

By राजू इनामदार | Updated: November 14, 2024 22:11 IST

महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते.

पुणे: मनूच्या आधारावर राज्य घटना तयार करावी असे म्हणणारे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची आठवण काढतात. ते तर घरावर तिरंगाही लावत नव्हते अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरूवारी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. नेताजी बोस, सरदार पटेल यांची आज नावे घेता, पण स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही कुठे होता असा खडा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.

महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे गुरुवारी पुण्यात आले होते. जाहीर सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहंमद त्यांच्यासमवेत होते. "मी ५३ वर्षे राजकारणात आहे. अनेक निवडणूका पाहिल्या, पण राज्यांच्या निवडणूकीत पंतप्रधान, ग्रुहमंत्री प्रत्येक मतदारसंघात फिरताना कधीही पाहिले नाही. ते येतात आणि गांधी कुटुंबाला शिव्या घालतात. महाराष्ट्रात राहुल गांधी मुख्यमंत्री होणार आहेत का? पण ते त्यांच्यावरच टीका करतात. कारण तोच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे," असं खरगे यांनी म्हटलं.

"तुम्ही देशात, महाराष्ट्रात काय करणार आहात ते सांगा, पण ते तसे काहीही बोलत नाहीत अशी टीका करून खर्गे म्हणाले, "तूम्ही भ्रष्टाचारी आहात असे सांगून त्यांनी काहीजणांना धमकावले व नंतर त्यांनाच बरोबर घेतले. देशात महागाई वाढली, अन्नधान्य महाग झाले, बेरोजगारी वाढली. त्यावर बोलले तर ठीक आहे, पण ते इथले प्रोजेक्ट तिकडे घेऊन चालले आहेत. सत्ता बदलण्यासाठी ते काहीही करतात. महाराष्ट्र मणीपूर गोवा अशी कितीतरी ऊदाहरणे आहेत. खोके आणि सबकुछ ओके अशी त्यांची पद्धत आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या सर्व घोषणांची अमलबजावणी काँग्रेसच्या सरकारांनी सत्तेवर आल्यानंतर केली. आम्ही बजेट पाहूनच घोषणा करतो व त्या अमलातही आणतो. आमच्याकडे डोके आहे, तुमच्याकडे खोके आहे," असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

बटेंगे तो कटेंगे या घोषणेचाही खरगे यांनी समाचार घेतला. देश एकच आहे व तो एकच ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस नेहमीच तयार असते असेही खरगे यांनी म्हटलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PuneपुणेMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपा