शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:12 IST

Maharashtra Unseasonal Rain: मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार २२ ते २४ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी सकाळी ठिकठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. तर महामुंबईमध्ये पेण, बदलापूर आणि कर्जत या ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असून हवामानातील हे बदल पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहेत. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २२ ते २४ एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. हवामानातील हे बदल दिलासा देणारे असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

नागरिकांसाठी सूचना  

- विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.- झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.- मोकळ्या जागेत मोबाइल फोन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये.- यात्रा, धार्मिक कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन स्थगित करावे.

राज्यात कुठे कुठे अवकाळी?

हिंगोली: जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजली. शेतातील उभी ज्वारी आडवी झाली. 

सिंधुदुर्ग: कणकवली शहरासह परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. आठवडा बाजार असल्याने ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. 

ठाणे, रायगड: पेण, कर्जत, बदलापूरसह काही ठिकाणी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बदलापुरात गारांचा पाऊस झाला.

सोलापूर: सोलापुरात संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rain Alert: Storms, Hail, and Rain Expected in Maharashtra

Web Summary : Maharashtra faces unseasonal rain with storms and hail expected until Friday. Citizens are advised to seek shelter during lightning, avoid open areas, and postpone large gatherings. Some districts already experienced rainfall and crop damage. Temperatures will remain around 40 degrees Celsius in some regions despite the rain.
टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र