शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

शहरातील सर्वाधिक वाहतूक नियमभंग करणाऱ्या टॉप १०० चालकांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:46 PM

यादीतील सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या वाहनचालकाने ४४ वेळा केला नियमभंग

ठळक मुद्दे१०८ वेळा केसेस : सर्वाधिक दंड ७० हजार रुपयेनियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात सीसीटीव्ही कॅमेरे, ई-चलनच्या माध्यमातून कारवाई

पुणे : शहरात वाहतुकीच्या नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. शहरात सर्वाधिक वेळा वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या टॉप १०० वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांनी जाहीर केली आहे. त्यात बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका वाहनचालकाने १०८ वेळा नियमभंग केला असून त्याच्यावर ४२ हजार ३०० रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. तर एका वाहनचालकावर ७० वेळा नियमभंग केल्याबद्दल सर्वाधिक ७० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तर या १०० जणांच्या यादीतील सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या वाहनचालकाने ४४ वेळा नियमभंग केला आहे.वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ई-चलन यंत्राच्या माध्यमातून कारवाई सुरु केली आहे. कारवाई केल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला मोबाइलवर संदेश पाठविला जातो. त्याने केलेला नियमभंग आणि दंडाच्या रक्कमेची माहिती दिली जाते. दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करुन दिली आहे. अनेक वाहनचालक दंडाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत आहेत. वाहनचालकांनी वेबसाईट उघडल्यानंतर आपला वाहन क्रमांक टाकल्यास आपल्या वाहनांवर प्रलंबित असलेल्या केसेसची सविस्तर माहिती दिसते. त्यामध्ये पीटीपीसीएचएम व पीएनसीसीएम म्हणजे ई-चलन मशिनद्वारे कारवाई झाली आहे, असे समजावे. या कारवाईमध्ये केलेल्या केसेसमध्ये वाहनचालकास त्याचा फोटो पहायला मिळत नाही व ज्यांना कारवाई मान्य नाही, ते न्यायालयात दाद मागू शकतात. तसेच पीएनसीसीसी म्हणजे सीसीटीव्ही मार्फत झालेली कारवाई आहे, असे समजावे. यामध्ये आपल्याला सीसीटीव्ही मार्फत काढलेले फोटो पुरावा म्हणून पहावयास मिळेल़ या सबंधात काही तक्रार असल्यास पोलीस निरीक्षक, मल्टीमीडिया सेल, वाहतूक शाखा कार्यालय यांच्याकडून अर्ज स्वीकारुन समाधान केले जाईल. थकीत दंड वसूल करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहिम राबविण्यात आली असली तरी काही जण दंड जमा करण्यास टाळाटाळ करत आहेत. सर्वाधिक वेळा नियमभंग करणारे तसेत थकीत दंडाची रक्कम जमा न करणाऱ्या वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे तसेच पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. --येथे तपासा ऑनलाइन दंड वाहतूक पोलिसांनी केलेला दंड तपासण्यासाठी https://trfficech.gov या मोबाईल अ‍ॅपवर माहिती तपासता येणार आहे. ही माहिती तपासण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इंजिन क्रमांक किंवा चॅसिस क्रमांकाची शेवटचे चार आकडे गरजेचे असतात.

  

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर