Join us  

बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 10:08 AM

गुरूचरणने बेपत्ता होण्याआधी मित्राला शेवटचा मेसेज केला होता. याबाबत अभिनेता आणि निर्माता मजीठिया यांनी माहिती दिली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तारक मेहता मालिकेत गुरुचरण सोढी ही पंजाबी भूमिका साकारत होता. गेल्या ४ दिवसांपासून गुरूचरणचा काहीच पत्ता नसल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. गुरूचरण दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. मात्र तो मुंबईत पोहचलाच नाही. गेल्या २ दिवसांपासून त्याचा फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. 

गुरूचरणने बेपत्ता होण्याआधी मित्राला शेवटचा मेसेज केला होता. याबाबत अभिनेता आणि निर्माता मजीठिया यांनी माहिती दिली आहे. "गुरूचरण दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी २२ एप्रिलला घरातून निघाला होता. पण, तो मुंबईला पोहोचलाच नाही. आणि दिल्लीतील घरीही तो परत गेला नाही.  आमची फॅमिली फ्रेंड भक्ती सोनी त्याला एअरपोर्टवर घ्यायला गेली होती. पण, तो तिला एअरपोर्टवर भेटलाच नाही. जेव्हा तिने एअरपोर्ट सहकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी गुरूचरण विमानात बसलाच नसल्याचं सांगितलं. पण, गुरूचरणने विमानात बसण्याआधी भक्तीला मेसेज करून तो विमानात बसणार असल्याचं सांतिलं होतं. मग तो गेला कुठे? मी मीटिंगमध्ये असताना भक्तीने मला फोन करून याबाबत कळवलं", असं ईटाइम्सशी बोलताना जेडी मजीठिया यांनी सांगितलं. 

गुरुचरण सिंगला सगळेच तारक मेहता मालिकेतील सोढी नावानेच ओळखतात. 'ओ पापाजी'म्हणत सोढी नेहमीच जॉली मूडमध्ये असायचा. काही वर्षांपूर्वीच त्याने वडिलांच्या तब्येतीच्या कारणास्तव मालिका सोडली. इतर कलाकारांप्रमाणेच त्याच्याही पेमेंटचे इश्यू झाले. जेनिफर मिस्त्रीच्या वादावेळी गुरुचरणचेही पैसे परत मिळाले. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार