Join us  

TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:17 AM

TMKOC Sodhi Missing: सोढी ऊर्फ गुरुचरण सिंग यांच्या बँक आणि फोन व्यवहारातून काही तपशील समोर आले आहेत. तसंच cctv फुटेजमध्ये...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंग सोढी या भूमिकेत दिसलेले अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध वडिलांनी दिल्ली येथील पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाची केस दाखल केली आहे. IPC कम 365 अंतर्गत FIR ही दाखल करण्यात आली आहे. तसंच पोलिस CCTV आणि बँक व्यवहाराचा तपास करत आहेत. त्यातून महत्वाची माहिती उघडकीस आली आहे.

गुरुचरण सिंग हे 50 वर्षांचे आहेत. दिल्लीत वास्तव्यास असणारे त्यांचे वडील हरगीत सिंग यांना भेटण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर दिल्ली विमानतळावरुन ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मात्र ते मुंबईला पोहोचलेच नाहीत आणि ना दिल्ली येथील घरी परतले. हरगीत सिंग यांना पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की ते गुरुचरण सिंग यांना शोधून काढतील. आपला मुलगा जिथे कुठे असेल सुरक्षित असू दे अशी आशा वडिलांनी केली आहे.

CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

25 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता गुरुचरण सिंग यांच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी CCTV फुटेज पाहिलं असून यामध्ये गुरुचरण एअरपोर्टवर जाताना दिसत आहेत. पोलिसांनी त्यांचे फोन ट्रान्झॅक्शनही पाहिले असून बरंच संशयास्पद आढळून आलं आहे. तसंच त्यांच्या बँक खात्यातील व्यवहारही संशयास्पद आहेत. त्या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत. 

गुरूचरण दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी २२ एप्रिलला घरातून निघाले होते. पण, ते मुंबईला पोहोचलेच नाही. आमची फॅमिली फ्रेंड भक्ती सोनी त्याला एअरपोर्टवर घ्यायला गेली होती. पण, ते तिला एअरपोर्टवर भेटलेच नाही. जेव्हा तिने एअरपोर्ट सहकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी गुरूचरण विमानात बसलेच नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण, गुरूचरण यांनी विमानात बसण्याआधी भक्तीला मेसेज करून ते विमानात बसणार असल्याचं सांगितलं होतं. मग ते गेले कुठे? मी मीटिंगमध्ये असताना भक्तीने मला फोन करून याबाबत कळवलं", असं ईटाइम्सशी बोलताना जेडी मजीठिया यांनी सांगितलं. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारटेलिव्हिजनबेपत्ता होणंसीसीटीव्हीपोलिस