शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

सायन्स सोडून कॉमर्सला गेला आणि सी ए'च्या परीक्षेत देशात पहिला आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 8:11 PM

अनेकदा आपण ज्या मार्गावर चालत असतो तो आपल्याला योग्य वाटत असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. एका नव्या वळणावर नशीब आपल्याला नेते आणि आपण आहोत त्यापेक्षाही पुढे जातो.

पुणे : अनेकदा आपण ज्या मार्गावर चालत असतो तो आपल्याला योग्य वाटत असतो. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते. एका नव्या वळणावर नशीब आपल्याला नेते आणि आपण आहोत त्यापेक्षाही पुढे जातो. हाच अनुभव घेतलाय सी एच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या रजत राठी याने. विज्ञान शाखेत 12वी पूर्ण करणाऱ्या रजतने अचानक वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि चक्क देशात पहिला आला.      मंगळवारी सी ए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात रजतने देशात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. पण विशेष म्हणजे त्याने बारावीपर्यंत सी ए होण्याचा विचारही केला नव्हता. मात्र त्यानंतर केलेल्या कल चाचणीत त्याचा वाणिज्य शाखेचा कल आला आणि त्याने थेट सी ए'चा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला तोही साशंक होता पण अखेर निश्चय केला आणि केलेल्या मेहनतीचे अखेर चीज झाले.     त्याचे वडील एक मेडिकलच्या दुकानात कामाला आहेत तर आई गृहिणी आहे.  मात्र घरातल्या आर्थिक परिस्थितीचे कोणतेही दडपण न घेता त्याने अभ्यास केला.तो याबाबत सांगतो, मी दररोज तीन तास अभ्यास करायचो. परीक्षेच्या आधी तीन महिने ही वेळ वाढवत सहा तासांपर्यंत नेली. त्यातही सलग अभ्यास न करता तो मधेमधे विश्रांती घेत असे. मात्र अभ्यासात सातत्य राखायला तो यशस्वी झाला. याबाबत तो सांगतो, ' सी ए'ची परीक्षा महाकठीण आहे, १६ तास अभ्यास करावा लागतो असं म्हटलं जातं. मला अजिबात असं वाटत नाही. परीक्षेसाठी अभ्यासक्रम विस्तृत असला तरी त्यातही सगळं करण्यापेक्षा मी स्मार्ट स्टडी केला. जे आवश्यक, महत्वाचं आहे तेवढ्यावर भर दिला. मला वाटतं परीक्षेचा बाऊ करण्यापेक्षा सातत्याने अभ्यास केला तर हीच काय कोणतीही परीक्षा पार करणे अवघड नाही. 

टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थी