"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:52 IST2025-05-20T10:51:29+5:302025-05-20T10:52:16+5:30

छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे, पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा

Laxman Hake has said that after Chhagan Bhujbal Supriya Sule Jayant Patil Rohit Pawar will also get ministerial posts | "छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

"छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है", लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असून, याचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या संदर्भात बोलताना "छगन भुजबळ तो झाकी है, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है." असे म्हणत पुढील काही दिवसांत अजून काही बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभि बाकी है असे म्हणत हाके यांनी बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. सुप्रिया सुळे केंद्रात , रोहित पवार, जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसांत पाहायला मिळतील असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले त्याचे आम्ही स्वागत करतो. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे. पण ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

Web Title: Laxman Hake has said that after Chhagan Bhujbal Supriya Sule Jayant Patil Rohit Pawar will also get ministerial posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.