पूर्व हवेलीतील बड्या ग्रामपंचायतींना मिळणार भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:20+5:302020-12-08T04:10:20+5:30

जिल्हा परिषदेस मुद्रांक शुल्काद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल मिळणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यादीत वाघोली ग्रामपंचायतीचा वरचा क्रमांक लागतो. या पार्श्वभूमीवर विविधविकासकामांसाठी निधीचा ...

Large Gram Panchayats in East Haveli will get huge funds | पूर्व हवेलीतील बड्या ग्रामपंचायतींना मिळणार भरीव निधी

पूर्व हवेलीतील बड्या ग्रामपंचायतींना मिळणार भरीव निधी

जिल्हा परिषदेस मुद्रांक शुल्काद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल मिळणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यादीत वाघोली ग्रामपंचायतीचा वरचा क्रमांक लागतो. या पार्श्वभूमीवर विविधविकासकामांसाठी निधीचा ओघ प्रशासनाकडून ग्रामपंचार्तीना सुरु असतो. वाघोलीसह लोणीकाळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीलाही मुद्रांक शुल्क स्वनिधी दिला जाणार असून याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

तसेच ग्रामपंचायतंकडे सदर निधी तातडीने वर्ग करण्यात येेेणार असल्याची माहिती दिली. दरम्यान जिल्हा परिषद तसेच पीएमआरडीएकडून होत असलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला द्वारे वाघोलीसह लगतच्या आठ ते नऊ गावच्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाणार असून यासंदर्भातही यावेळी झालेल्या विशेष बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, कदमवाकवस्तीचे चित्तरंजन गायकवाड, व तिन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Large Gram Panchayats in East Haveli will get huge funds