हडपसरमध्ये घरफोडीद्वारे १२ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:09 IST2021-04-13T04:09:40+5:302021-04-13T04:09:40+5:30

पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून १२ लाख ३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची ...

Lampas looted Rs 12 lakh in Hadapsar | हडपसरमध्ये घरफोडीद्वारे १२ लाखांचा ऐवज लंपास

हडपसरमध्ये घरफोडीद्वारे १२ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून १२ लाख ३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ७ ते ११ एप्रिलदरम्यान हडपसरमधील ससाणेनगर भागातील प्रतिभा रेसिडन्सीमध्ये घडली. याप्रकरणी सुयोग जाधव (वय ३९, रा. ससाणेनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचे एकत्रित कुटुंब ससाणेनगरमधील प्रतिभा रेसिडेन्सीमध्ये राहतात. त्यांच्या मूळ गावी अचानक एका नातलगाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वजण ७ एप्रिलला गावी गेले होते. त्या कालावधीत फ्लॅट कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटले आणि त्यांच्या घरातील १ लाख रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १२ लाख ३ हजारांचा ऐवज चोरून नेला. गावाहून परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे जाधव यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली.

-----------------------

Web Title: Lampas looted Rs 12 lakh in Hadapsar