शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

Video: येळकोट येळकोट जय मल्हार! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:34 IST

सदांनंदाचा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याची मुक्त उधळण करत पालखीचे कऱ्हा नदीकडे प्रस्थान

बी.एम. काळे 

जेजुरी : मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असल्याने जेजुरीत आज सुमारे चार लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. सदांनंदाचा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याची मुक्त हस्ताने उधळण करीत यात्रा पूर्ण करीत होता. या वर्षातील शेवटची यात्रा, पुढील सण २०२५ मध्ये एकही सोमवती यात्रा नसल्याने  भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवार पासूनच जेजुरीत येत होता. 

रविवारी उत्तररात्री पहाटे ४ वा. सोमवती आमवस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक जेजुरीत मिळेल त्या वाहनाने येत होते. दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. यावेळी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, अनिल सौन्दडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, ऍड विश्वास पाणसे, ऍड पांडुरंग थोरवे उपस्थित होते. 

गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी कूच केले. यावेळी देव संस्थानच्या वतीने बंदुकीची फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील, व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळ कोट येळकोट जय मल्हार’ , तसेच ‘सदांनंदाचा येळकोट’ चा जयघोष करीत भंडार खोबर्‍याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडार्‍यात न्हाऊन निघाला होता.

तळपत्या सूर्य देवाला साक्षी ठेवत पालखी सोहळा गड कोटातून कऱ्हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकर्‍यांनी उत्सव मूर्तींची वजनाने खूप जड असणारी पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरुन शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंच बागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जांनुबाई चौकं मार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कऱ्हा नदीकडे कूच केले. भेसळयुक्त भंडारा बंदी आणि महाद्वार पथावरील अतिक्रमणे हटवाल्याने भाविकांनी मोकळा श्वास घेतला. समाधान व्यक्त केले. 

 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राriverनदीTempleमंदिरSocialसामाजिक