शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मोडून पडला संसार तरी...

By admin | Updated: March 29, 2017 00:26 IST

येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले

दावडी : येथे पाच झोपड्यांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख जळून खाक झाले. या आगीत नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असून क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे.दावडी येथील गव्हाणेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नानुबाई पांडुरंग जाधव, दीपक पांडुरंग जाधव, सोमनाथ पांडुरंग जाधव व चिमा बबन भालेराव गेल्या १८ वर्षांपासून येथे झोपड्या बांधून राहत होते. शेती करणे, ज्वारी-बाजरी राखण्याची कामे घेणे असे हे कुंटुबकाम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी (दि. २७) सर्व जण जेवण करून रात्री १० वाजता झोपले असता अचानक झोपडीला आग लागली. झोपडीत नवीन घरकामांसाठी वडिलांनी दिलेले सात लाख रुपये नानुबाई जाधव झोपडीतील ठेवलेल्या साडीत गुंडाळून ठेवले होते. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे साडीत गुंडाळून ठेवलेले पैसे बाहेर काढता आले नाहीत. तसेच बाजरीच्या धान्याची पोती, घरात ठेवलेला एक तोळ्याचा सोन्याचा दागिना, कपडे, भांडी, लहान मुलांची शाळेची दप्तरे तसेच संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या असून एकूण ९ लाख रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. अनिता जाधव या महिलेच्या पाठीला झोपडीत झोपलेल्या मुलांना बाहेर काढताना भाजले आहे.या आगीत नुकसान झालेल्या वस्तूंचा पंचनामा तलाठी डी. एम. खोमणे, कोतवाल देवेंद्र ओव्हाळ यांची केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, खेडचे आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेची विचारपूस करून तातडीची मदत म्हणून ११ हजार रुपये रोख या कुटुंबाला दिले. या कुटुंबाला पुनर्वसनासाठी मदत केली जाईल, असे आमदार गोरे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, तसेच खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनीही घटनास्थळी जाऊन या कुटुंबाला धीर दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, निमगावचे सरपंच अमर शिंदे-पाटील, विजयसिंह शिंदे आदींनी भेट दिली. अर्ध्या तासात सारे नष्टझोपडी गवत व ताटांची असल्यामुळे तसेच रात्री वारा सुटल्यामुळे आग क्षणात सगळीकडे पसरली. झोपड्या एकमेकांना लागून असल्यामुळे अर्धा तासात जळून खाक झाल्या. झोपडीतील महिला-पुरुष मंडळींनी आरडाओरडा केला. जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी जवळपास पाणी नसल्यामुळे आग विझवता आली नाही.