शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

हंगामा खडा करना मेरा काम नहीं...; अशोक धिवरे यांनी उलगडली साहित्याची परिभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:03 IST

साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. 

ठळक मुद्देबदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे : लक्ष्मीकांत देशमुखअभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे : डॉ. अभिजित वैद्य

पुणे : ‘हंगामा खडा करना मेरा काम नहीं, सूरत बदलनी चाहिए... हे साहित्यिकाचे ब्रीदवाक्य असायला हवे. दु:खाची आणि वेदनेची भाषा बोलते ते साहित्य. साहित्यिकांनी दु:खाचे गाणे गायले पाहिजे, अशा शब्दांत राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी लेखणीतून वाद ओढवून घेणाऱ्या साहित्यिकांना साहित्याची खरी परिभाषा उलगडून सांगितली. 
निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मीकांत देशमुख यांच्या सत्कार समारंभाचे. राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या हस्ते देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. 
खोपडे म्हणाले, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मराठी भाषा खरंच सक्षम आहे का? याचा विचार व्हायला हवा. आज ग्रामीण भागात इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असल्यामुळे शेतमजुरालाही आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालण्याचा मोह होत आहे. 
सत्काराला उत्तर देताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘लेखक साहित्यातून दु:खाची कहाणी सांगत असतो. प्रत्येक माणसाचे दु:ख हे वेगळे असते. प्रत्येक जाती धर्म, वंचित घटकांच्या दु:खावर भाष्य करायला हवे. मी अगदी गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर लिखाण केले आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असतानाही लेखन करीत होतो. त्या लिखाणावरून अनेकदा मोर्चे निघाले, चार बदल्या झाल्या. तरीही शासनाच्या चौकटीत राहून लिखाण करण्याचे काम केले.  बदलाच्या प्रक्रियेत विवेकवाद आणि विज्ञानवाद जोपासला गेला पाहिजे.’ 
डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, ‘एकीकडे मानवी मूल्यांची घसरण होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा परिस्थितीत साहित्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची खरी गरज आहे.’ 

टॅग्स :Puneपुणे