पुणे शहरात उद्या 'नो हॉर्न प्लिज' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार  

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 11, 2020 01:02 PM2020-12-11T13:02:10+5:302020-12-11T13:05:32+5:30

पुणे शहरात दिवसभरात अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यातील ९० टक्के हॉर्न हा विनाकारण वाजवला जातो.

An innovative project called 'No Horn Please' will be implemented in Pune tomorrow | पुणे शहरात उद्या 'नो हॉर्न प्लिज' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार  

पुणे शहरात उद्या 'नो हॉर्न प्लिज' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार  

Next

पुणे : पुणे शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच प्रमाणात शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनांचे संख्या वेगाने वाढत चालली आहे.  मात्र याचा परिणाम पर्यावरणावर होत असून वाढत्या प्रदूषणामुळे पुणेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जवळपास एक दिवसात पुण्यामध्ये अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षात शहरातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर पुण्यात काही सामाजिक संस्था व पुणे पोलिसांच्या पुढाकाराने १२ डिसेंबरला 'नो हॉर्न' अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.

पुण्यातील लाईफ सेव्हिंग फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस वाहतूक विभागाकडून शहरात १२ डिसेंबर रोजी पूर्ण दिवस हॉर्न न वाजवण्याचा एक अभिनव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमादरम्यान शनिवारी दुपारी वाजता टिळक चौकात प्रबोधनपर कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, क्रीडा समालोचक सुनंदन लेले आदी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यात विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याचाच दुष्परिणाम आपल्याला नागरिकांच्या आरोग्यव्यवस्थेवर झालेला पाहायला मिळतो आहे. पुणेकरांमध्ये ब्लड प्रेशर, हदयरोग, ताणतणाव, चिडखोरपणा, नैराश्य आणि ऐकण्याच्या समस्या वाढल्या आहेत. याच अनुषंगाने भविष्यातील ध्वनिप्रदूषणामुळे निर्माण होणारे धोके टाळण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी हॉर्नच्या योग्य वापरासंबंधी सूचना देणारे फलक लावलेले आढळतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपण विनाकारण हॉर्न वाजवत ध्वनिप्रदूषणात वाढ करतो. हे टाळण्यासाठी 'नो हॉर्न' संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे आहे, अशी माहिती नवचैतन्य हास्ययोग परिवारचे मकरंद टिल्लू यांनी दिली आहे. 

तसेच या उपक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री अमृता सुभाष, मुक्ता बर्वे, अभिनेता अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर, कवी संदीप खरे यांनी उपक्रमाचे कौतुक करताना आपला पाठिंबा दर्शविला आहे. 

........... 

पुणे शहरात दिवसभरात अंदाजे १ कोटी वेळा हॉर्न वाजवला जातो. त्यातील ९० टक्के हॉर्न हा विनाकारण वाजवला जातो. १० टक्केच हॉर्न हा निमित्त मात्र वाजतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात पुण्यातील ध्वनिप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये हॉर्नमुळे होत असलेले ध्वनिप्रदूषण व शारीरिक समस्यांविषयी जनजागृती व्हावी. तसेच त्यांनी कमीतकमी हॉर्नचा वापर करावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी १२ डिसेंबरला आयोजित करत असतो. 
देवेंद्र पाठक,  लाईफ सेव्हिंग फाउंडेशन

Web Title: An innovative project called 'No Horn Please' will be implemented in Pune tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.