वर्गव्यवस्थेची विषमता दूर व्हायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:14+5:302021-01-08T04:30:14+5:30

भोर : श्रीमंतांच्या मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळत असतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्या मिळत नाही. यामुळे वर्ण ...

The inequality of the class system must be eliminated | वर्गव्यवस्थेची विषमता दूर व्हायला हवी

वर्गव्यवस्थेची विषमता दूर व्हायला हवी

भोर : श्रीमंतांच्या मुलांना सर्व शैक्षणिक सुविधा मिळत असतात. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना त्या मिळत नाही. यामुळे वर्ण नव्हे तर वर्ग व्यवस्था निर्माण झाली आहे. ही विषमता दूर होण्यासाठी राज्यघटनेने दिलेला शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळालाच पाहिजे, तरच देश सक्षम होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील आवणी संस्थेच्या संचालिका प्रा. अुनराधा भोसले यांनी केले.

भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयाचे सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त आयोजित सावित्रीबाई फुले विचार महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. वृषाली रणधीर या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. मनोहर जाधव, महसूलचे सहआयुक्त संतोष हराळे, जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त

प्रसाद शिंदे, प्राचार्य डाॅ. प्रसन्नकुमार देशमुख,फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक डाॅ. प्रा. रोहिदास जाधव, डाॅ. प्रदिप पाटील, डाॅ. अरुण बुरांडे, डाॅ. सुरेश गोरेगावकर, रावसाहेब पवार, सुनंदा गायकवाड, विजया पाटील, सविता कोठावळे, हसीना शेख, सुजाता दळवी, प्राचार्य मोहन ताकवले, सुरेश साळुंके उपस्थित होते.

या वेळी प्रा. अनुराधा भोसले यांचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने शाल श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन डाॅ. मनोहर जाधव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी संतोष हराळे, डाॅ. प्रसन्नकुमार देशमुख,डाॅ. मनोहर जाधव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात डाॅ. वृषाली रणधीर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.सुजाता भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कोठावळे व सुजाता भालेराव यांनी केले. आभार अशोक शिंदे यांनी मानले.

०४ भोर सत्कार

अनुराधा भोसले यांचा सत्कार करताना मनोहर जाधव व इतर.

Web Title: The inequality of the class system must be eliminated