शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य

By नितीश गोवंडे | Updated: December 6, 2024 17:44 IST2024-12-06T17:43:54+5:302024-12-06T17:44:05+5:30

१४ वर्षीय मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी दोन वेळा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला

Indecent act of a minor boy with a minor girl who came for tutoring | शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य

शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अल्पवयीन मुलाचे अश्लील कृत्य

पुणे : शिकवणीसाठी आलेल्या शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीनाविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत मुलीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आठ वर्षांची मुलगी येरवडा भागात एका महिलेकडे खासगी शिकवणीसाठी जायची. शिक्षिकेचा १४ वर्षीय चुलतभाऊ तेथे राहायला आहे. आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नव्हती. तेव्हा मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलगी दोन दिवसांपूर्वी शिकवणीसाठी घरी आली. तेव्हाही शिक्षिका घरी नव्हती. त्यावेळी मुलाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली. चौकशीत शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने मुलीबरोबर दोनदा अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. १४ वर्षीय मुलाविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका देवकर पुढील तपास करत आहेत.

Web Title: Indecent act of a minor boy with a minor girl who came for tutoring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.