शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सहकार्याने इंदापूर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम स्थानी येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST

-- इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान राबविले आहे. हे अभियान निसर्गाच्या ...

--

इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान राबविले आहे. हे अभियान निसर्गाच्या पंचमहातत्त्वांवर म्हणजेच भूमी, जल वायू, अग्री, आकाश यांचा समावेश असून त्यातून शहराच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण मध्येही देशात प्रथमस्थानी इंदापूर नगरपरिषद येण्यासाठी इंदापूर शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने उत्तरायण सप्ताहा निमित्ताने ( दि. १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२१ ) या कालावधीत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा, गटनेते कैलास कदम, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे, नगरसेविका हेमलता माळुंजकर, मीना मोमीन, अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, विशाल बोन्द्रे, महादेव सोमवंशी, हमीद आतार, जावेद शेख, सागर गानबोटे, रमेश धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत पंचमहातत्त्वावर आधारित घटकांचे पर्यावरणातील महत्व दर्शवणारी कलाकृती, साहित्य, देखावा, प्रकल्प अशा विविध प्रकारे स्पर्धकांनी सादर केली . याची नगरपरिषद कार्यालयाकडून नियुक्त केलेल्या तज्ज्ञांकडून तपासणी केली व प्रत्येक पंचमहातत्त्वाच्या घटकातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्याची निवड करण्यात आली.

--

प्रकल्प बनावा स्पर्धेचा निकाल असा :

यामध्ये पृथ्वी विषयात प्रथम क्रमांक नागेश राम केंगार, द्वितीय क्रमांक दर्शन धनंजय दळवी, तृतीय क्रमांक विनय अशोक कचरे, तर वायू विषयात प्रथम क्रमांक वैष्णव प्रमोद धांगेकर, व्दितीय ऐश्वर्या सुरेश शिंदे, तृतीय श्रद्धा सौदागर गोडसे, तर जल विभागात प्रथम क्रमांक हसिबा शमशेर शिकलकर, द्वितीय क्रमांक सागर बापू शिंदे, तृतीय क्रमांक राजेस्वी जाधव, तर अग्नी विभागात प्रथम क्रमांक अंकित दीपक चव्हाण, द्वितीय क्रमांक स्नेहल संतोष साबळे, तृतीय क्रमांक बाबासाहेब रामचंद्र भोंग यांना मिळाला.

---

फोटो क्रमांक : २७ इंदापूर माझी वसुंधरा संपर्धा

फोटो ओळ : माझी वसुंधरा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरण करताना नगराध्यक्षा अंकिता शहा व मान्यवर