शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला अखेर धो-धो बरसला!

By admin | Updated: September 7, 2015 04:20 IST

अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा

पळसदेव : अडीच महिन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यामुळे ये रे... ये रे... पावसा अशी विनवणी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून करीत होता. अन् अचानक शनिवारी (दि. ५) रात्री निसर्गाच्या मनात आले अन् तो धो... धो... बरसला. दीड तास पडत असलेल्या या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी पाणी करून टाकले. अन् बघता बघता बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. इंदापूरच्या पश्चिम भागाला शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. ओढे वाहू लागले, बंधारे भरले. शेतीमध्ये पाणी साचले. पाऊस काही पडत नव्हता. पर्यायाने शेतातील पिके जळू लागली. जनावरे, वन्यप्राणी यांना चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली. तरीही पावसाचे आगमन होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत होता. मात्र शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा वाहात होता. अचानक गाराही पडत होत्या. बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. वारा शांत झाला अन् पावसाचा वेग वाढला. भादलवाडी, डाळज, अकोले, पोंधवडी, कुंभारगाव या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. ओढे वाहू लागले. बंधारे भरले. शेतातील सरींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पावसाने मुख्य पीक असलेल्या उसाला अधिक फायदा झाला आहे. जळू लागलेल्या पिकांना या पावसाने मोठा आधार मिळाला आहे. विजाही कडकडत होत्या. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. बिल्ट कंपनीजवळ वीजवाहक तारांवर झाड पडले. तसेच, चारचाकी वाहनांवरही झाडे कोसळली.दडी मारल्यानंतर प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ऊस, कडवळ, मका, बाजरीच्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. (वार्ताहर)