इंदापूर बसस्थानक समस्यांचे ‘आगार’

By Admin | Updated: June 22, 2016 00:49 IST2016-06-22T00:49:10+5:302016-06-22T00:49:10+5:30

येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गटारांचे चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे

Indapur Bus Station Problems 'Depot' | इंदापूर बसस्थानक समस्यांचे ‘आगार’

इंदापूर बसस्थानक समस्यांचे ‘आगार’

इंदापूर : येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात जागोजागी खड्डे पडलेले आहेत. गटारांचे चेंबर तुंबल्याने मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे. या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. यामुळे येथे येणारे प्रवासी तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या सूत्रानुसार हे बस स्थानक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी बरेच व्यापारी गाळे आहेत. पुणे, सोलापूरपासून ते कर्नाटक, हैदराबादकडे ये-जा करणाऱ्या एसटी बस येथे येत असतात. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बस स्थानक असल्याने लोकांची, प्रवाशांची सतत वर्दळ असते. एसटी बस ये-जा करण्याच्या मार्गावर व त्या जेथून सुटतात, तेथे अनेक खड्डे पडलेले आहेत. गेल्या पंधरवड्यात गटाराचे चेंबर तुंबले आहे. मैलामिश्रित सांडपाणी दूरपर्यंत पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. खड्डे बुजवण्याची वा चेंबर स्वच्छ करण्याची तसदी कुणीही घेतली नाही. सफाई झालीच, तर कचरा कडेलाच लोटला जातो. ते डुकरांसाठी नंदनवन ठरते. सध्या समाधानकारक पाऊस नाही. पाऊस पडण्याआधी साफसफाई केली नाही, तर इंदापूर एसटी बस स्थानक अस्वच्छता व दुर्गंधीची परिस्थिती बिकट होणार आहे.

Web Title: Indapur Bus Station Problems 'Depot'