रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:10 IST2021-04-19T04:10:39+5:302021-04-19T04:10:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७१२ जण कोरोनामुक्त ...

An increase of 6,434 corona victims on Sunday | रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ

रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधितांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात रविवारी ६ हजार ४३४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ७१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २४ हजार ७२ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २६़७२ टक्के इतकी आहे़

दरम्यान आज दिवसभरात ७३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २० जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६६ टक्के इतका आहे़

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ८७० कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २५० रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १८ लाख ८० हजार ७३५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ६७ हजार २३७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख ४ हजार ४९२ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५६ हजार ६३६ इतकी आहे़

---------------------------------

Web Title: An increase of 6,434 corona victims on Sunday