बुधवारी १९८ कोरोनाबाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:24+5:302021-02-05T05:17:24+5:30

पुणे : शहरात बुधवारी १९८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३०६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार ५३ ...

An increase of 198 coronary arthritis on Wednesday | बुधवारी १९८ कोरोनाबाधितांची वाढ

बुधवारी १९८ कोरोनाबाधितांची वाढ

पुणे : शहरात बुधवारी १९८ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ३०६ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ४ हजार ५३ संशयितांची तपासणी केली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.८८ टक्के इतकी आहे़

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये १०९ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहे. ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २१४ इतकी आहे़ आज दिवसभरात १ जणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७६९ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही आजमितीला १ हजार ६२६ इतकी आहे़

शहरात आजपर्यंत १० लाख ३७ हजार १७९ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ९२ हजार ३७९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८५ हजार ९८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

Web Title: An increase of 198 coronary arthritis on Wednesday