शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

पालखीला पालिकेकडूनच ‘गैरसोय’

By admin | Updated: June 22, 2017 06:56 IST

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे पालिकेकडून कोणत्याही प्रकारची तयारी करण्यात आलेली नव्हती, असा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमधून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. वारकऱ्यांसाठी ना प्यायच्या पाण्याची व्यवस्था होती, ना आरोग्याच्या सुविधा देण्यात आल्या होत्या. मांडवही घालण्यात आलेले नसल्याचे सांगून महापौर काहीही ऐकून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र विरोधी पक्षाची भाषा चुकीची असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षांनी वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीवर लक्ष वेधून महापौर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. सभात्यागाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे आणि शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. वारकऱ्यांना प्यायला पाणी नव्हते, औषधोपचार मिळाले नाहीत. पूर्वी शहरात १५० मांडव टाकण्यात येत असत, या वेळी केवळ ९० मांडव टाकण्यात आल्याचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वसाधारण सभेत महापौरांनी या विषयावर चर्चा होऊ दिली नाही, असेही ते म्हणाले.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी गेल्या ६० वर्षांत वारकऱ्यांची पहिल्यांदाच एवढी गैरसोय झाली असून, १५ वर्षांपासून महापालिकेत असलेल्या भाजपा सदस्यांना वारकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा द्यायच्या, याची माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. तर नाना पेठ, भवानी पेठेत वारकऱ्यांना विविध गैरसोयींचा सामना करावा लागला, असे माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी सांगितले.