शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

केशरी रेशनकार्डसाठी अडवणूक

By admin | Updated: May 26, 2014 05:08 IST

केशरी रेशनकार्ड मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागत आहे.

दीपक जाधव, पुणे - अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मिळणारे धान्य, राजीव गांधी विमा योजना तसेच शैक्षणिक सवलती यांसह इतर अनेक सवलतींसाठी अत्यंत आवश्यक असणारे केशरी रेशनकार्ड मिळविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा आटापिटा करावा लागत आहे. परिमंडळ कार्यालयांमध्ये रेशनकार्डांचे काम घेऊन नागरिक गेले असता त्यांना केशरीऐवजी शुभ्र रेशनकार्डच घेण्याची सक्ती केली जात आहे. शहरातील अन्नधान्य विभागाच्या ८ परिमंडळ कार्यालयातून रेशनकार्डांचे वितरण करण्यात येते. उत्पन्नगटानुसार केशरी, शुभ्र व पिवळ्या रेशनकार्डांचे वाटप केले जाते. मात्र, केशरी रेशनकार्ड काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून आलेल्या तोंडी आदेशामुळे वितरण बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रेशनकार्डवर ५९ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या सर्वांना अन्नधान्य सुरक्षा कायद्यांतर्गत अन्नधान्य देण्यात येते, त्यामुळे केशरी रेशनकार्ड असलेल्यांनाही त्याअंतर्गत अन्नधान्य मिळू शकत आहे. मात्र, केशरी रेशनकार्डअभावी गोरगरिबांना लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शैक्षणिक प्रवेशासाठी पिवळे व केशरी या दोन प्रकारचेच रेशनकार्ड याकरिता चालते. राज्य शासनाने सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी विमा योजनेअंतर्गतही पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डची आवश्यकता असते. याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, केशरी रेशनकार्डांचे वितरण करणे बंद करण्यात आलेले नाही. केवळ नागरिकांचे उत्पन्न तपासूनच त्यांना केशरी रेशनकार्ड वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांना केशरी रेशनकार्ड वितरीत केले जाते, मात्र सध्या एक लाखांच्या आत उत्पन्न असलेले कोणी गरीब नागरिक शहरात राहिलेच नसल्याचे अन्नधान्य वितरण कार्यालयाने ठरवून टाकणे चुकीचे आहे, तरी त्यांनी तातडीने केशरी शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लोकहित फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.