पाबळ कृषी उपबाजारचे रविवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:26+5:302021-09-25T04:09:26+5:30

बाजार समितीच्या चार एकर जागेमध्ये सुसज्ज कार्यालय व व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी रस्ते विद्युत व्यवस्था या ...

Inauguration of Pabal Agriculture Sub Bazaar on Sunday | पाबळ कृषी उपबाजारचे रविवारी उद्घाटन

पाबळ कृषी उपबाजारचे रविवारी उद्घाटन

बाजार समितीच्या चार एकर जागेमध्ये सुसज्ज कार्यालय व व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी रस्ते विद्युत व्यवस्था या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. पाबळ परिसरातली वीस-बावीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार कृषिमाल असून, विक्रीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे, असे बाजार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर यांनी सांगितले. पाबळ येथील उपबाजार केंद्र सुरू व्हावे यासाठी माजी सभापती शंकर जांभूळकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, पंचायत समिती उपासभापती सविता पऱ्हाड, माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य सुभाष उमाप व बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.

Web Title: Inauguration of Pabal Agriculture Sub Bazaar on Sunday