इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 18:22 IST2024-08-02T18:20:51+5:302024-08-02T18:22:17+5:30

प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती

in indapur pravin mane from ajit pawar group will enter the Sharad Pawar group in pune city | इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश

इंदापूरात अजित पवार गटाला धक्का; प्रविण माने करणार शरद पवार गटात प्रवेश

कळस : इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे युवानेते जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने हे उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रवीण माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. माने यांची इंदापूर तालुक्यात मोठी ताकद आहे. सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातुन त्यांनी मोठे जाळे विणले आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र अचानक माने यांनी सुळे यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावेळी प्रवीण माने यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती. मात्र माने हे अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी समर्थकांसह हातात घेणार आहेत. यामुळे इंदापूरमध्ये राजकारणाची गणितं बदलणार असून सध्याच्या परिस्थितीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत होईल असे चित्र आहे.

Web Title: in indapur pravin mane from ajit pawar group will enter the Sharad Pawar group in pune city