शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

पूरग्रस्तांची तातडीची मदत आचारसंहितेच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:56 AM

जिल्ह्यात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध ठिकाणी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली...

ठळक मुद्देसरकारकडे सहा कोटींची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३ कोटींचे वाटप

विशाल शिर्के- पुणे : जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील ७ हजार १४४ पैकी ५ हजार ९८३ पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची पाच हजार रुपयांची मदत दिली असून, अजूनही अकराशेहून अधिक कुटुंबांना मदत पोचलेली नाही. जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे मागितलेली तब्बल सहा कोटी रुपयांचा मदत निधी आचारसंहितेमुळे अडकला असल्याने उर्वरित निधी दिवाळीनंतरच उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात २५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह विविध ठिकाणी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली. त्यात हवेली, पुणे शहर, भोर, बारामती आणि पुरंदर तालुक्यांचा समावेश आहे. घरांची पडझड, वाहनांचे नुकसान, किराणा दुकान, बेकरी, लहान-मोठ्या हातगाड्या, घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, दुभती जनावरे वाहून जाणे असे नुकसान झाले होते. बाधितांना तातडीची मदत म्हणून १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पंचनामे केले आहेत. अजूनही अंतिम नुकसानीचा अहवाल समोर आला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीवर पाच हजार रुपयांच्या मदतीचे अधिकार आहे. त्यानुसार बाधितांना जिल्हा प्रशासनामार्फत तातडीची मदत देण्यात येत आहे. प्रशासनाने आतापर्यंत २ कोटी ९९ लाख १५ हजार रुपयांचे वाटप केले आहे. मात्र, अजूनही पुणे शहर आणि बारामती तालुक्यातील १ हजार १६१ कुटुंबियांना ५ हजार रुपयांची तातडीची मदत मिळालेली नाही. मदतनिधीसाठी आंबिल ओढा पूरग्रस्त संघर्ष समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पर्वती पायथ्यापासून खालील भागातील अंदाजे तीनशे ते साडेतीनशे घरांचे नुकसान झाल्याचा दावा आंदोलकांनी केला होता. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, आंबिल ओढा परिसर पूरग्रस्तांच्या बँक खात्यांची अडचण होती. तसेच, इतर ठिकाणी देखील बँक खात्यांमुळेच पाच हजार रुपयांची तातडीची मदत देता आली नाही. संबंधित तहसीलदारांना त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जाणारी पाच हजार रुपयांची तातडीची मदत त्यांना मिळेल. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे बाधितांना तब्बल १६ कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे. तेव्हाची एक कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. ती, सप्टेंबर महिन्यातील बाधितांना देण्यात येईल. ......७६ गावांतील ७ हजार १४४ कुटुंबे बाधितसप्टेंबरमधील पुरामुळे हवेली, पुणे शहर, भोर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ७६ गावांतील ७ हजार १४४ कुटुंबे बाधित झाली होती. त्यातील ग्रामीण भागातील १ हजार १९१ आणि शहरी भागातील ५,९५३ कुटुंबांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १ हजार ३० आणि शहरी भागातील ४ हजार ९५३ कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने ५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे. .....जिल्हाधिकारी स्तरावरील मदत देण्याचे काम सुरू आहे. उर्वरित दहा हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे ६ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. ही रक्कम मिळाल्यावर त्याचेही तातडीने वाटप केले जाईल. - डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी...... २५ सप्टेंबरच्या पुरातील बाधित कुटुंबे  तालुका        बाधित     ग्रामीण-शहरी     मदत दिलेली     दिलेली                  शिल्लक                         गावे         बाधित               कुटुंबे               रक्कम                    कुटुंबे        हवेली          १८           १९३९                   १९३९              ९६,९५,०००               ०  पुणे शहर      २              ४१००                 ३४२३                १,७१,१५,०००         ६७७  भोर               ३                २१                   २१                   १,०५,०००                 ० बारामती       १२                 ८४२               ३५८                      १७,९०,०००          ४८४पुरंदर            ४१              २४२                 २४२                    १२,१०,०००                ०एकूण            ७६               ७१४४              ५९८३                 २,९९,१५,०००         ११६१

टॅग्स :PuneपुणेfloodपूरFamilyपरिवारGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका