शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायती सुधारल्यास देशाचा विकास

By admin | Updated: August 14, 2015 03:19 IST

स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून ग्रामपंचायत ही संकल्पना अस्तित्वात असल्याची नोंद ऋग्वेदातही पाहायला मिळते. स्वावलंबन, शक्तीनिश्चिता, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व हे गुण

वाकड : स्वातंत्र्यापूर्वीच्या हजारो वर्षांपासून ग्रामपंचायत ही संकल्पना अस्तित्वात असल्याची नोंद ऋग्वेदातही पाहायला मिळते. स्वावलंबन, शक्तीनिश्चिता, स्वतंत्रता आणि सार्वभौमत्व हे गुण प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये हवेत. सर्व ग्रामपंचायती स्वावलंबी झाल्या, तरच देशाचा विकास साधता येईल, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी माण येथे केले. देशातील ५ लाख ग्रामपंचायतींपैकी इतर ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ठरणाऱ्या आदर्श १० ग्रामपंचायतींची केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने २ जानेवारी २०१५ रोजी रोल मॉडेल म्हणून निवड केली. यापैकी पुण्यातील माण ग्रामपंचायतीचही निवड झाली. यासाठी खास तीनदिवसीय पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांनी गुरुवारी ग्रामपंचायतीला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. या वेळी राव यांच्या हस्ते माण पॅटर्न या चित्रफितीचे व डिजिटल लॉकर या सुविधेचे उद्घाटन, तर ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले. ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून त्यांनी स्तुती केली. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंग, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुळशीचे सभापती रवींद्र कंधारे, उपसभापती सविता पवळे, गटविकास अधिकारी शालिनी कडू, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुटे, सरपंच पार्वती भरणे, उपसरपंच चंद्रकांत ठाकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती हुलावळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर मांडेकर, उपाध्यक्ष नंदकुमार भोईर, सुरेश हुलावळे, हिंजवडीचे सरपंच श्यामराव हुलावळे, माजी उपसरपंच सुनील भरणे, पांडुरंग ओझरकर, तानाजी पारखी उपस्थित होते . (वार्ताहर)