शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द केल्यास आंदोलन करणार

By admin | Updated: June 16, 2014 08:16 IST

महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या रविवारी पिंपरीतील बैठकीत बोलताना अध्यक्ष शरद राव

बैठक : महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या रविवारी पिंपरीतील बैठकीत बोलताना अध्यक्ष शरद राव. 

महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी, तसेच सर्व क्षेत्रांतील कामगार-कर्मचार्‍यांना आवाहन करणारा ठराव मंजूर केला. राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करू नये, असे आवाहन केले. तसेच आंदोलनाच्या सर्मथनार्थ सार्वजनिक परिवहन सेवेतील कामगार, ऑटो रिक्षावाले, फेरीवाले, लाखो कंत्नाटी कामगार बेमुदत आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. पिंपरी : राज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यास महाराष्ट्रातील सर्व महापालिकांचे कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारविरोधी मतदान करून धडा शिकवतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शरद राव यांनी रविवारी पिंपरी येथे दिला. महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनच्या राज्यभरातील प्रमुख कामगार प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते. फेडरेशनचे सरचिटणीस शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे, सुभाष सरीन, प्रकाश जाधव, रवि राव, बापू पवार, दीपक कुलकर्णी, डॉ. नवनाथ महारनवर, डॉ. सुरेश ठाकूर, गणेश शिंगे उपस्थित होते.शरद राव म्हणाले, ''उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता एलबीटी रद्द करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केल्यास महाराष्ट्रातील सर्व महापालिकांतील सर्व कामगार-कर्मचारी बेमुदत आंदोलन करतील. एलबीटी व जकातची बाब न्यायप्रविष्ट असून, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकार कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. असे असताना न्यायलय निर्णयाची वाट न पाहता निर्णय घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल. १0 मे २0१३ रोजी सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू व न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ४ महिन्यांत मुंबई उच्च न्यायालयाने जकात व एलबीटीसंदर्भात सुनावणी घ्यावी, असे सांगितले आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयातून या दाव्याची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. या कारणाने आमच्या वकिलांनी अर्ज करूनही हादावा बोर्डावर घेतला नाही. जकात व एलबीटीचा प्रश्न उच्च न्यायालयामार्फत सोडविल्यानंतरच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावयास हवा, केवळ राजकीय व मूठभर व्यापार्‍यांच्या मतांचा विचार करून किंवा व्यापार्‍यांच्या दबावाखाली येऊन सरकारने निर्णय घेऊ नये.''(प्रतिनिधी)