'समीर अन् रामदास' समाजासाठी आदर्श, सुप्रिया सुळेंकडून माणूसकीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 01:21 PM2022-04-28T13:21:10+5:302022-04-28T13:31:59+5:30

वारजे पुल परिसरात झालेल्या अपघातात पुराणिक कुटुंबातील जखमी मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले

Ideal for 'Sameer An autodriver Ramdas' community, appreciation of police and autodriver by Supriya Sule | 'समीर अन् रामदास' समाजासाठी आदर्श, सुप्रिया सुळेंकडून माणूसकीचं कौतुक

'समीर अन् रामदास' समाजासाठी आदर्श, सुप्रिया सुळेंकडून माणूसकीचं कौतुक

Next

कोथरुड (पुणे) : वारेज येथील एका अपघातानंतर वाहतूक कर्मचाऱ्यामधील देवमाणसाचे दर्शन पुणेकरांना घडले. समीर बागशीराज यांनी पुण्यात घडलेल्या अपघातावेळी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे सध्या त्यांचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीह समीर आणि त्यांना मदत करणाऱ्या रिक्षावाल्या रामदास यांचं कौतुक केलंय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांनी लोकमतने केलेली बातमी शेअर करत दोघांचेही आभार मानले आहेत. 

वारजे पुल परिसरात झालेल्या अपघातात पुराणिक कुटुंबातील जखमी मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले. अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्यांनी मुलीला उचलून घेत काही अंतर धावत हॉस्पिटल गाठले. या कामी त्यांना रिक्षाचालक रामदास नवले यांनीही मदत केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले. त्यांचे हे काम इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे. समीर बागसिराज आणि रामदास नवले यांच्यासारखी माणसं समाजासाठी आदर्श आहेत. या दोघांचेही मनापासून आभार, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी समीर यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. 

काय आहे प्रसंग 

पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला. जेमतेम आठ-दहा दिवसांपूर्वी मुंबई-पुणे हायवे वरील वारजे भागातील पुलावर वाहनांचा गर्दीमध्ये मनोज पुराणिक यांच्या चारचाकीला मागील बाजूस ट्रकने धडक दिल्याने व पुढील वाहनाच्या मधे पुराणिक यांच्या गाडीचा अपघात झाला.

यात त्यांची पत्नी दोन मुली असा परिवार होता. या अपघातात परिवारातील सर्वच जखमी झाले. परंतु त्यांची आठ वर्षाची मुलगी ही जास्त घाबरली तिला काय सुचेनासे झाले. हे अपघातच दृश्य पाहून दोन्ही मुली जखमी असताना रडत होत्या. अपघात झाल्याने हायवेवर सर्व वाहनांची गर्दी (ट्रॅफिक) झाली होती. जास्त गर्दी असल्याने या प्रसंगी वेळेस रुग्णवाहिका येणे शक्य नव्हते. गाडी जास्त प्रमाणात चेंबली असल्ल्याने जमलेले सर्वांचे या अपघातातील कुटुंबाला वाचण्यासाठी या वाहनातून वाचवावे कसे असा प्रश्न भेडसावत होता. यावेळी सर्व जण बघ्याची भूमिका घेत होते.

त्याचवेळी या वाहनाची गर्दी कमी करण्यासाठी येथे वाहतूक पोलीस हजर झाले. रुग्णवाहिका येईपर्यंत सर्वजण वाट पाहत होते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागशीराज यांनी हा प्रसंग पाहताच जणू काही आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत म्हणून समोरील रक्तश्राव होत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीकडे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि काही क्षणात ते चिमुकलीला स्वतःच्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावले. वाहनाच्या गर्दीत बागशिराज धावपळ करत होते. या अपघातात चिमुकलीचे आई- बाबा आणि बहीण यांनाही गंभीर दुखापत झाली. परंतु ते कसे बसे रुग्णालयात दाखल झाले. पोलीस कर्मचारी बागशीराज यांनी या केलेल्या कामगिरीमुळे चिमुकलीचे बाबा मनोज पुराणिक यांनी खूप खूप आभार मानले, तुमच्या प्रयत्न, धावपळी मुळे माझी लेक वाचू शकली असे उद्गार त्यांनी काढले. 

पोलीस म्हटले की, आपल्यावर झालेल्या कारवाईचा राग, पैसे खाऊ, असे लोक पोलिसांवर ठपका ठेवतात परंतु या झालेल्या घटनेत पुन्हा पोलिसांच्या रूपातील देवमाणूस, माणुसकी पुढे आला आहे.  “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” याप्रमाणे खरोखरच पोलीस कर्तव्य पार पाडत आहेत. ही कामगिरी वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त राहुल श्रीरामे, वारजे वाहतूक विभागाचे पी. आय. बापू शिंदे, पोलीस हवालदार सुतार, वसंत पवार महेश बनकर, प्रभाकर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 

Web Title: Ideal for 'Sameer An autodriver Ramdas' community, appreciation of police and autodriver by Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.