शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

संकटांवर मात करून आदर्श शेती

By admin | Updated: September 5, 2015 03:22 IST

स्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते.

शैलेश काटे, इंदापूरस्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते. निमगाव केतकी जवळच्या राऊतवाडी येथील सिंधूबाई लक्ष्मण राऊत या ६४ वर्षे वयाच्या शेतकरी महिलेने हे दाखवून दिले आहे. वयाच्या ३८व्या वर्षी विधात्याने माथ्यावर वैधव्याचा शाप लिहिला. पदरात एकुलता एक मुलगा, त्याचे शिक्षण, पालनपोषण व घर चालवण्याची जबाबदारी सिंधूबार्इंवर येऊन पडली. सोबत कर्तसवरतं कुणीच नव्हतं. होती तीन एकर जिरायती जमीन. ६३ फूट खोल कोरडी विहीर. मात्र न डगमगता, सिंधूबार्इंनी पडेल ते कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तो प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागला. सन २००४पासून गेल्या दोन वर्षांपर्यंत तीन वेळा रानात बोअर खोदल्या. पण एकदाही पाणी लागलं नाही. हिंमत न हारता, शिक्षक असणाऱ्या मुलाला शिक्षक पतसंस्थेतून साडेतीन लाख रुपये कर्ज काढावयास लावले. त्या रकमेतून रानातील बारा गुंठ्यांत ६० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे तयार करून घेतले. शेजारच्या शेतकऱ्याच्या विहिरीतून ३०० रुपये प्रतितास प्रमाणे पाणी घेऊन शेततळे भरले. त्यावर ठिबक सिंचन संच जोडून घेतला.शेळगाव परिसरामध्ये तेल्या रोगामुळे डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेबहारमध्ये सुमारे ६० टक्के नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये आता हस्तबहार छाटणीला सुरुवात झाली आहे. येथील १० टक्के लोकांनी बागा काढून टाकल्या आहेत. तेल्याचे जिवाणू सुप्तावस्थेत दीर्घकाळ राहात असल्यामुळे योग्य वातावरणात त्याची वाढ होऊन अचानक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- भजनदास पवार (डाळिंब उत्पादक, शेळगाव)