शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरांच्या वडिलांचे उत्पन्न कोटींमध्ये; नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:39 IST

ias pooja khedkar - उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी असल्यास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळते; त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या वडिलांची प्राप्तिकर कडून चौकशी होणार

पुणे: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Ias Pooja Khedkar) यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांवरून आता त्यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी होणार आहे. दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? असा सवाल उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी होणार असल्याचे समजते.

पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एनटी ३ या संवर्गातून प्रवेश मिळवला होता. त्यावेळी त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडल्याचे स्पष्ट झाले होते. वास्तविक, दिलीप खेडकर हे त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे २००७ मध्ये त्यांचे उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यानंतर पूजा खेडकर यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर एका वर्षातच अर्थात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटी रुपये संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पूजा यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. याच अनुषंगाने आता प्राप्तिकर विभागाने दिलीप खेडकर यांनी सादर केलेल्या प्राप्तिकर परताव्यावरून त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :Puneपुणेias pooja khedkarपूजा खेडकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीEducationशिक्षणWomenमहिला