पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:03 IST2025-12-15T12:02:22+5:302025-12-15T12:03:22+5:30
Pune Katraj Accident: महिलेच्या पतीचे निधन झाले असून आता मुलगी एकटी राहिली आहे, तिच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी
कोंढवा: कात्रजकोंढवा रोडवर इस्कॉन मंदिराच्या जवळ सोमवारी सकाळी दुचाकी व कंटेनर चा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी चालक महिलेचा मृत्यू झाला आहे. रमा कापडी असे या महिलेचे नाव असून त्या जे.एस.पी.एम मध्ये शिक्षिका आहेत. कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू असून हा रस्ता अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. या रस्त्यावर अजून एक मोठे अपघात झाले असून यात शेकडो नागरिकांचा निष्पाप बळी गेलेला आहे.
खडीमशीन चौकाकडून कात्रज च्या दिशेने जाताना दुचाकीवरून महिला जात असताना मोठ्या कंटेनरच्या चाकाखाली सकाळी साडे सातच्या दरम्यान येऊन अपघात झाला. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वेळेत उपचार मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती प्रथमदर्शनी दिली. रमा कपाडे (वय ५३) रा. कात्रज कोंढवा रोड असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या महिलचे नाव आहे.
कात्रज कोंढवा रोड वरती मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक असताना वाहतूक पोलिसांकडून ढिसाळ नियोजन तसेच कात्रज कोंढवा रस्त्याचे अपूर्ण काम आहे. त्यामुळे अपघात होऊन एका निष्पाप महिलेचा आज मृत्यू झाला आहे. असे आणखी किती बळी या रस्त्यावरती जाणार आहेत. या प्रशासनाचा आम्ही निषेध करत आहोत.- सुरेश कवडे, सामाजिक कार्यकर्ते.
गेल्या साडेचार वर्षात या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर २५ बळी
गेल्या साडेचार वर्षात या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्यावर ५५ हुन अधिक अपघात होउन त्यात २५ बळी गेले आहेत. या महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते. सध्या मुलगी व आई राहत होते. आईचा अपघात झाल्याने व दुर्दैवी मृत्यू झाल्याने आता मुलीच्या उदरनिर्वाहाचा, शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.