पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांच्या पतीचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 18:03 IST2018-05-27T16:01:42+5:302018-05-27T18:03:45+5:30

पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांचे पती अायपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे अाज निधन झाले.

husband of ips rashmi shukla passed away | पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांच्या पतीचे निधन

पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांच्या पतीचे निधन

पुणे :  पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांचे पती वरिष्ठ अायपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे अाज निधन झाले. गेल्या अाठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका अाला हाेता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यानच त्यांची अाज प्राणज्याेत मालवली. त्यांचे निधन झाल्याने शुक्ला परिवारावर दुःखाचा डाेंगर काेसळला अाहे.

उदय शुक्ला हे मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये पोलीस महानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा अायुक्त म्हणून कार्यरत हाेते. त्यांना कर्कराेग झाल्याचे निदान काही महिन्यांपूर्वी झाले हाेते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत हाेते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत चालली हाेती, अखेर त्यांचे आज निधन झाले. शुक्ला यांच्या पश्चात एक मुलगा अाणि एक मुलगी अाहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना माेठा धक्का बसला अाहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू हाेता. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच अनेकांनी रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: husband of ips rashmi shukla passed away