शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 23:07 IST

Ajit pawar Latest Video: अजित पवार ओळखले जातात ते स्पष्टवक्तेपणासाठी... अनेक ठिकाणी बोलत असताना अजित पवारांना कुणीतरी प्रश्न विचारत आणि ते बोलतात. असंच घडलंय, तेही पुण्यात...

Ajit Pawar Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गंमतीशीर विधानांचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. स्पष्टवक्तेपणामुळे कुणी काही मुद्दा उपस्थित केला की, अजित पवारांना लगेचच त्यावर बोलून जातात. पण, त्यानंतर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो. असाच काही प्रकार पुण्यात घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. एका कार्यक्रमात ते बोलत असताना एक व्यक्ती उठते आणि एक मुद्दा मांडते. त्यानंतर अजित पवार काय बोलले?

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'ट्री मॅन' म्हणून ओळख असणारे सुप्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला. 

अजित पवार बोलत असताना काय घडलं?

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा प्रश्न :  शहरातील नदी लगतची, दुर्गा देवी टेकडी वरची वृक्षतोड होणार आहे, आपण पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवावी अशी अपेक्षा आहे.

अजित पवारांचे उत्तर : हे सगळं ऐकल्यावर कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटायला लागलं आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीचं घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश द्यायचे. ठीक आहे, धन्यवाद...

मारुती भापकर यांच्या प्रश्नाल असं उत्तर देत अजित पवारांनी हात जोडले. 

तुला अक्कल, आम्ही बिनडोक...

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) सकाळी चाकणच्या तळेगाव आणि आंबेठाण चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळीही त्यांना एका व्यक्तीने त्यांच्यासमोर मुद्दा मांडला. "अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आहेत. आमचे जीव जात आहेत", असे ती व्यक्ती म्हणाली. 

त्यावेळी अजित पवार म्हणाले, "तुलाच अक्कल आहे का, आम्ही बिनडोक आहोत का, आम्हीसुद्धा आठ वेळा निवडून आलो आहोत. या शहाण्याला काही कळत नाही. आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं. सकाळी साडेचारला उठून आम्ही कामं केली आहेत. या परिसराच्या विकासासाठी तीनशे, चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. जर आम्ही अतिक्रमणे काढली तर पुन्हा तुमची नाराजी सोसावी लागते", अशा शब्दात अजित पवारांनी त्याला सुनावलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSocial Viralसोशल व्हायरलPuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाNCPराष्ट्रवादी काँग्रेस