शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

गृहिणी ते नॅशनल चॅम्पियन ; तिचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:24 IST

चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता

पांडुरंग मरगजेपुणे (धनकवडी) : चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता.एक गृहिणी ते नँशनल चँम्पियनशिप आणि २०२० च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आहे. खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चिकाटी, दृढनिश्चय आणि सातत्याने केलेल्या सरावाच्या जोरावर निता मेहता यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या एशियन गेम्स् वुमन्स पाँवरलिफ्टींग चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करीत २०२० मध्ये होणाऱ्या विश्वस्तरीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे. निता या पुण्यातील सारसबाग परिसरात राहात असून, सातारा रस्ता परिसरातील नामांकित संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. . निता यांनी वयाच्या तिशीनंतर उत्तम आरोग्यासाठी दृढनिश्चय करून व्यायामाला सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतः चे आरोग्य उत्तम  असावे म्हणून फावल्या वेळात त्या व्यायाम करु लागल्या. मात्र अगदी कमी कालावधीमध्येच त्यांच्या मधील स्पिरिट आणि कौशल्य प्रशिक्षक ओंकार नेलेकर यांनी हेरले आणि निता यांनी पाँवरलिफ्टींगमध्ये करिअर म्हणून सराव करण्याचा सल्ला दिला.

त्यांनी लगेच सरावाला सुरुवात केली. योग्य आहार, व्यायामाचे नियोजन, सातत्य आणि कठोर मेहनत करीत निता यांनी पाँवरलिफिटंगमध्ये चँम्पियनशिप बनण्याचे स्वप्न पाहिले. आणि ते पुर्ण केले. स्टेट, नँशनल आणि आशियन गेम्स चँम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या निता यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. निता यांनी आपल्या गटामध्ये स्काटमध्ये शंभर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले, बेंचप्रेस मध्ये ४७.५ किलो वजन उचलत सिल्व्हर पदक मिळविले तर डेटलेफ्ट मध्ये ११५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले. याबाबत त्या म्हणाल्या की, 'कोणत्याही वयात ध्येय गाठणं कठीण नाही, फक्त त्यासाठी लागते ती जिद्द. सुरुवातीला मलाही पॉवरलिफ्टिंग अवघड वाटत होतं, पण प्रयत्न केल्यावर त्यात रस निर्माण झाला. हा अतिशय चांगला क्रीडाप्रकार आहे, यात अजून महिलांनीही सहभागी व्हावं असं मला वाटतं'. 

टॅग्स :DhankawadiधनकवडीWomenमहिला