शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सदनिकेचा भाडे करार आता थेट पोलिसांकडे : वेळेची होणार बचत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:47 IST

आता कराराची नोंदणी झाली की संगणकाच्या माध्यमातून ही सर्व माहिती पोलिसांकडे त्वरीत जमा होईल..

ठळक मुद्देमुद्रांक शुल्कची नवी संगणक प्रणाली

पुणे : घरमालक व भाडेकरू यांच्यात होणाऱ्या कराराची नोंदणी केली की आता त्याची माहिती थेट पोलिसांकडे पोहचणार आहे. यामुळे पोलिसांकडे जाण्याची फेरी वाचणार असून त्यातून वेळेची बचतही होणार आहे. सरकारी कामकाज लोकाभिमूख व्हावे असे सरकारचे धोरण असून त्याला पुरक असाच हा निर्णय असल्याचे मत या प्रणालीचे उद्घाटन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.मुद्रांक शुल्क कार्यालय तसेच पोलिस आयुक्त कार्यालय यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या संगणक प्रणालीची सुरूवात पाटील यांनी हस्ते शुक्रवारी दुपारी नव्या प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक शुल्क कार्यालयात झाली. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख, पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे, नोंदणी उपमहानिरिक्षक सोनप्पा यमगर, सहनोंदणी महानिरीक्षक नयना बोंदार्डे तसेच या विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चोक्कलिंगम यांनी प्रास्तविक केले. या आधी घरमालक भाडेकरू यांनी कराराची नोंदणी केल्यानंतर त्यांना ती कागदपत्रे घेऊन पोलिसांकडे जाऊन तिथे जमा करावी लागत असे. यात त्यांचा वेळ तर खर्च होत असेच शिवाय पोलिसांकडेही ती कागदपत्रे गहाळ वगैरे होत असत. आता कराराची नोंदणी झाली की संगणकाच्या माध्यमातून ही सर्व माहिती पोलिसांकडे त्वरीत जमा होईल, त्यासाठी तिथे स्वतंत्रपणे जाण्याची गरज पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.कवडे यांनी मुद्रांक शुल्क विभागाच्या कामाची तसेच डिजीटल कामाकाजासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. पोलिस आयुक्त वेंकटेशम यांनी पोलिस व सर्व सरकारी कार्यालये यांच्यात समन्वय साधून नागरिकांची कामे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त चांगल्या दर्जाची कशी होईल यासाठी पोलिस आयुक्तालय प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांच्या हस्ते यावेळी मुद्रांक शुल्क विभागाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसHomeघर