शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर टोलजवळ भीषण अपघात, गॅस टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 22:59 IST

संतप्त नागरिकांकडून टँकरची तोडफोड

खेड शिवापूर: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी (पुणे) येथील राजेंद्र बबन मोरे (वय ५५) व सविता राजेंद्र मोरे (वय ४२) हे दुचाकीवरून साताऱ्याकडे जात होते. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पाठीमागील सातारा लेनवर आले असता गॅस टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही टँकरखाली ओढले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकर आणि दुचाकी दोन्ही वाहने वेगात होती. टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेनंतर दुचाकी रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत फेकली गेली होती.

घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. मात्र, गंभीर दुखापतींमुळे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. संतप्त नागरिकांनी गॅस टँकरची तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक सुरळीत करत पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. टँकर चालक राज किशन बी. (रा. तिरुपुरम) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Couple Dies in Gas Tanker Accident Near Khed Shivapur Toll

Web Summary : A couple died instantly near Khed Shivapur toll after their motorcycle was hit by a gas tanker. The deceased were identified as Rajendra and Savita More from Pune. The tanker driver has been arrested, and an investigation is underway.
टॅग्स :Accidentअपघात