शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

२६ जानेवारी रोजी येरवडापासून ‘जेल पर्यटन’ सुरु होणार : गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 12:23 IST

येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन

ठळक मुद्देयेरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार

पुणे : राज्यातील कारागृहे हे स्वातंत्र्य पूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये प्रिझन टुरिझम ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहापासून जेल पर्यटन प्रकल्पाने होणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.  

येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईनद्वारे या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. यावेळी येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असून आपण ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे असे देशमुख यांनी सांगितले.कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. त्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ ने दिले होते.

येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वांतत्र्य लढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढार्‍यांनी या कारागृहामध्ये शिक्षा भोगली आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी कारागृह पर्यटन उपयुक्त ठरणार आहे. महात्मा गांधी व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला. त्याला गांधी यार्ड असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भही जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांची कोठडी येथे आहे. बॅरिस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस येरवडा कारागृहात होते. सरसंघचालक बाळासाहेब देसरस यार्डही येथे आहे. बाळासाहेब ठाकरे हे या तुरुंगात होते. यांचे सर्व संदर्भ पर्यटकांना येरवडा भेटीत पहायला मिळू शकणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलtourismपर्यटनUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुख