शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

‘झुंडशाही’ला चाप साध्या वेशातील पोलिसांचा

By admin | Updated: July 5, 2014 06:08 IST

रेल्वेच्या सिझन तिकिटाच्या बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून सुरू असलेल्या झुंडशाहीला रोख लावण्यासाठी पुणे ते मुंबई या मार्गांवर धावणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांची पथके अचानकपणे पाठविण्यात येणार.

पुणे : रेल्वेच्या सिझन तिकिटाच्या बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून सुरू असलेल्या झुंडशाहीला रोख लावण्यासाठी पुणे ते मुंबई या मार्गांवर धावणाऱ्या गाड्यांमध्ये साध्या वेशातील पोलिसांची पथके अचानकपणे पाठविण्यात येणार आहेत. त्या वेळी अरेरावी करताना आढळून येणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच, या प्रकारांची सखोल चौकशी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.सिझन तिकीट बोगीमध्ये जुन्या पासधारकांकडून नवीन पासधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये उजेडात आले. त्याचा सविस्तर वृत्तांत शुक्रवारी प्रकाशित होताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. त्याचबरोबर पासधारकांच्या मनमानीला तोंड द्यावे लागत असलेल्या अनेक प्रवाशांनी ‘लोकमत’ कार्यालयामध्ये फोन करून त्यांच्या व्यथा मांडल्या.पासधारकांच्या डब्यामध्ये झुंडीने एकत्र येऊन जुने पासधारक नवीन पासधारकांना सिटवर बसण्यास मज्जाव करतात. त्या त्यांच्या नेहमीच्या जागा असल्याचे सांगून उठविले जाते. त्याला विरोध करणाऱ्यास प्रसंगी शिवीगाळ व मारहाण केली जाते. याबाबत पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले, ‘‘अचानकपणे साध्या वेशातील पोलिसांची पथके पासधारकांच्या डब्यात पाठविली जातील. त्या वेळी अरेरावी करताना आढळून येणाऱ्या पासधारकांवर कडक कारवाई केली जाईल. रेल्वेच्या टीसीलाही जर शिवीगाळ केली जात असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी.’’वाणिज्य प्रबंधक के. के. मिश्रा यांनी सांगितले, ‘‘जमावाच्या अरेरावीला तोंड देणे एकट्या टीसीला शक्य होत नाही. रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेतली तरी त्यांना फौजदारी अधिकार नसल्याने त्यांच्या कारवाईला मर्यादा येतात. त्यामुळे रेल्वे पोलीस त्यांच्यावर प्रभावी कारवाई करू शकतील. त्यामुळे याकरिता रेल्वे मदत घेऊ, तसेच तिकीट तपासून अचानकपणे त्या बोगीला भेट देऊन पाहणी करतील.’’(प्रतिनिधी)