शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो सर, हाऊ आर यू ...! विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन किलबिलाटाने शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:15 IST

-- जेजुरी : हॅलो सर, हाऊ आर यू.. अशी आपुलकीची साद घालीत पुरंदर तालुक्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या ...

--

जेजुरी : हॅलो सर, हाऊ आर यू.. अशी आपुलकीची साद घालीत पुरंदर तालुक्यातील इयत्ता पहिली ते नववीच्या शाळा आज ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात सुरू झाल्या. एकमेकांच्या ओळखी आणि स्वागत आज शाळा-शाळांमधून होताना दिसत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा ऑनलाइन सुरू झाल्या. शाळा-शाळांमधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शोसल माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

पुरंदर-हवेलीचे आ. संजय जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता शेठ झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार शाळेचे मार्गदर्शक बी. एम. काळे यांनी पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळेच्या झूम ॲप मिटिंगमध्ये सहभागी होत प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील शाळा व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. स्वागत केले.

आज सकाळी १० वाजता शासकीय निर्णयांचे पालन करीत कदमवस्ती पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, मुख्याध्यापक अनंता जाधव, सहाशिक्षिका सुरेखा जाधव यांनी झूम मिटिंगद्वारे शाळेची सुरुवात केली. आ. संजय जगताप यांनी विद्यार्थी- पालकांशी संपर्क साधून शुभेच्छा व स्वागत केले.

यावेळी संजय जगताप म्हणाले की, पुरंदर तालुक्याची कोविडकाळातही गुणवत्ता चांगली राहिली आहे. शिक्षक आणि पालक-विद्यार्थी यांच्यातील दैनंदिन ऑनलाइन संपर्कामुळे चांगला समन्वय राहिलेला पाहावयास मिळाला. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही कोरोनाचा कसलाही परिणाम होऊ दिला नाही. कदमवस्ती येथील या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षेपेक्षा जास्त राहिली. शाळेच्या शिक्षकांचे यात मोठे योगदान असून ही शाळा एक मॉडेल स्कूल बनवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे.

पुरंदर तालुक्यातील ३०२ शाळा आजपासून ऑनलाइन सुरू होत आहेत. त्याचबरोबर पुढील १५ दिवस दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळांतून प्रवेश घेण्यासाठी पटनोंदणी पंधरवडाही सुरू झाला आहे. प्रत्येक दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळांतून प्रवेश दिला जाणार आहे. ऑनलाइन शाळा सुरू असताना दररोज पहिली ते नववी पर्यंतच्या शिक्षकांची ५० टक्के, तर दहावी-बारावीच्या शिक्षकांची १०० टक्के शाळेत उपस्थिती आवश्यक आहे. ऑनलाइन शाळा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याचेही निदर्शनास आलेले आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पालक मित्र, अथवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन गट शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले.

यावेळी साकुर्डे ग्राम पंचायतीचे सरपंच रमेश जाधव, सदस्य अजित जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कदम, पालक बबन कदम, हनुमंत कदम, संपत गरुड, उमेश जाधव, श्रीकांत सस्ते, विशाल चव्हाण, संजय चव्हाण उपस्थित होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. शालेय पाठ्यपुस्तके ही देण्यात आली.

स्वागत सरपंच रमेश जाधव यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक अनंता जाधव यांनी केले

फोटो मेल केला आहे कदमवस्ती शाळेतील झूम मिटिंग द्वारे शैक्षणिक वर्षाला सुरुवात