Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 19:45 IST2026-04-02T19:44:35+5:302026-04-02T19:45:17+5:30

सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे

Heavy rains in Pune; 65 mm of rain recorded in a single day today | Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद

Pune Rain: पुण्यात पावसाचा धुमाकूळ; आजच्या एका दिवसात तब्बल ६५ मिली मिटर पावसाची नोंद

पुणे : पुण्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. आजच्या पावसाने पुणेकरांची  दाणादाण उडाली आहे. सर्वत्र पाणीचपाणी पाहायला मिळत आहे. या पावसात झाडपडीच्या अनेक घटना घडल्या असून रस्तेही मोठ्या प्रमाणावर जलमय झाले आहेत. पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. 

आज भारतीय हवामान शास्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरात ६५ मिली मिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल हडपसरमध्ये ४२.५, पाषाण ३६.०३, लोहगाव २१ तर एनडीए येथे ८४ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपरीतील दापोडी येथे २९, चिंचवड २८.५ पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील माळीन येथे १८.५, डुडुळगाव १३.५, निमगीरी १३, नारायणगांव १२, तळेगाव ढमढेरे ६.५, राजगुरूनगर ४.५ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.

महापालिकेच्या हवामान केंद्रानुसार (पाऊस मिली मिटरमध्ये )

- खडकवासला - १०४.२
- सिंहगड रोड - १००.२
- कोंढवा येवलेवाडी - ९२.२
- बिबवेवाडी - ८१.४
- कोथरूड बावधण - ६६.६
- वारडे कर्वेनगर - ५९.२
- वानवडी रामटेकडी - ५४.६
- येरवडा कैलास - ५४
- भवानी पेठ - ५४
- कसबा विश्रामबागवाडा - ५३
- ढोले पाटील रोड - ५०.२
- शिवाजी नगर - ४८
- औंध बाणेर - ४३
- हडपसर मुंढवा - ३७
- नगररोड - ३६.४

आकडेवारी काय सांगते

- शहरात १४५ ठिकाणी पाणी साचले.
- ८२ ठिकाणी झाडे पडली
- ५० हून अधिक घरे आणि दुकानात पाणी शिरले.

Web Title : पुणे में बारिश का कहर: एक ही दिन में 65 मिमी बारिश दर्ज

Web Summary : पुणे में भारी बारिश से तबाही, 65 मिमी बारिश दर्ज। जलभराव और पेड़ गिरने से जीवन अस्त-व्यस्त। सिंहगढ़ रोड, हडपसर और पिंपरी-चिंचवड सबसे अधिक प्रभावित। 145 से अधिक स्थानों पर जलभराव, 82 स्थानों पर पेड़ गिरे।

Web Title : Pune Rain Havoc: 65mm Rainfall Recorded in a Single Day

Web Summary : Pune was lashed by heavy rain, recording 65mm rainfall. Waterlogging and tree falls disrupted life. Worst-hit areas included Sinhagad Road, Hadapsar, and Pimpri-Chinchwad. Over 145 locations saw water accumulation, and trees fell in 82 places.