Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:00 IST2025-06-06T15:57:30+5:302025-06-06T16:00:22+5:30

अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

Heavy rains begin in Pune with gale force winds; Citizens panic | Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

Pune Rain: पुण्यात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची उडाली धांदल

पुणे: पुण्यात दुपारनंतर अचानक वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून वातावरणात गरमी जाणवू लागली होती. दुपारच्या वेळेत कडक ऊन अनुभवायला मिळाले. तर आता अचानकच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राज्यात वातावरणात वारंवार बदल होताना दिसत आहे. एकाच दिवसात ऊन, पाऊस वाऱ्याचा खेळ सुरु जाहे. पुण्यातही तोच अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे. 

हवामान विभागाने पुढील दोन, तीन दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासहीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पुण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन, तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. वातावरणात कधी गरमी तर कधी थंडावा जाणवत होता. आज अखेर वरुणराजाने बरसण्यास सुरुवात केली आहे. 

अचानक सुरु झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले आहे. आकाश बऱ्यापैकी मोकळे असल्याने सकाळपासून पुणेकर रेनकोट, छत्री न घेता बाहेर पडले. दुपारनंतर ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाली. आणि आता जोरदार पाऊस पडू लागला. त्यामुळे रस्त्याला वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसून आले आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जोरदार वारे सुटल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्ते घसरडे झाल्याने वाहने रस्त्याच्या कडेला थांबल्याचे दिसून आले.

झाडांपासून लांब राहा 

मध्यंतरी झालेल्या पावसात झाडांच्या फ़ांद्या कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मुसळधार पावसात झाडेही पडू लागली आहे. काहींना या घटनेत जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा वादळी पावसात झाडांपासून लांब राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

Web Title: Heavy rains begin in Pune with gale force winds; Citizens panic