शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

तो चोरायचा खरेदी विक्रीच्या साईटवर स्वत:च विकलेली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 21:15 IST

दुचाकी विक्री करण्याच्या बहाण्याने विमाननगर आणि वाघोली येथील दोघांकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक

पुणे : आपल्याकडील दुचाकी तो ओएलएक्स या खरेदी विक्रीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर विक्री करायचा़. त्यानंतर आपल्याकडील दुसऱ्या चावीने ज्याला गाडी विकली, ती चोरुन पुन्हा तिसऱ्याला गाडी विकण्याचा प्रताप करणाऱ्याला येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे़. दर्शन जयकुमार अग्रवाल (वय ३४, रा़ काळाराम मंदिर, नाशिक) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी राहुल नथुजी कुमेरिया यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. दर्शन अग्रवाल हा गाडी चोरी करण्यात अतिशय पटाईत असून, ज्याला गाडी विक्री केली आहे. त्याची तो सुरूवातीला माहिती घेत असे. त्यानंतर बनावट चावीने गाडी चोरी करून फरार होत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  राहुल कुमेरिया हे एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्यांना सेकंड हॅण्ड  दुचाकी खरेदी करावयाची होती. त्यासाठी १५ नोव्हेंबरला त्यांनी  ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकीची माहिती सर्च करुन दर्शनशी ऑनलाईन व्यवहार करीत मोपेड दुचाकी खरेदी केली. मात्र अवघ्या ३ दिवसांनी १९ नोव्हेंबरला ते कामावर असताना पार्किंगमधून त्यांची दुचाकी चोरीला गेली़ त्यांच्या तक्रारीचा शोध घेत असतानाच त्यांना ज्या दर्शनने ही गाडी विकली होती़. त्यानेच चोरुन नेली असावी, अशा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले़. येरवडा पोलिसांचे एक पथक नाशिक येथे जाऊन त्यांनी दर्शन याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आपल्याकडील दुसऱ्या चावीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली़. तसेच त्याने कमी किंमतीत दुचाकी विक्री करण्याच्या बहाण्याने विमाननगर आणि वाघोली येथील दोघांकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक केल्याचे देखील सांगितले.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक बलभिम ननवरे, सहायक फौजदार बाळासाहेब बहिरट, हवालदार हणमंत जाधव, पंकज मुसळे, मनोज कुदळे, सचिन रणदिवे, नवनाथ मोहिते, कानिफनाथ कारखेले, समीर भोरडे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरonlineऑनलाइन