शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 18:09 IST

तेरा हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला

पुणे: रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. नाना पेठेतील आंदेकर चौकात वनराज आंदेकर चुलत भाऊ शिवमसोबत ते थांबले होते. यावेळी शिवम याच्यावर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवम थोडक्यात बचावल्याचे बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. 

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र शिवमसोबत थांबले होता. जवळच त्याचं घर होतं. आणि घरापासून चालत चालत ते मुख्य रस्त्या लागत असणाऱ्या चौकात आले. हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या. हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली. परंतु, शिवम खाली बसल्यानं तो बचावला. त्यानंतर सुरुवातीला एकाने आंदेकरांवर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडले. त्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. ते दोघे पळून जात असताना वनराज यांच्या बहीण संजीवनी आणि मेहुणा जयंत कोमकर बाल्कनीतून 'मारा, मारा, त्यांना सोडू नका,' अशी चिथावणी देत होते. तेव्हा आरोपींपैकी एका जण शिवमच्या अंगावर धावून गेला होता. मात्र, शिवम तिथून पळून गेला. हल्लेखोरासमोर वनराज यांचा मात्र टिकाव लागला नाही आणि तो त्यांच्या हाती लागला. आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्‍यांनी पळ काढला.

रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती. तसेच वनराज यांची बहीण संजीवनी यांना पोलिसांनी ताब्यात  घेतले. तर संशयित म्हणून सोमनाथ गायकवाडही पोलिसांच्या ताब्यात आहे. कालच पोलिसांनी १३ हल्लेखोरांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस