Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी

By सुशांत जाधव | Updated: April 28, 2026 01:31 IST

Open in App
1 / 8

IPL च्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून भुवनेश्वर कुमार आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवताना दिसत आहे.

2 / 8

भारतीय जलदगती गोलंदाजीतील स्विंगचा किंग अशी ओळख असलेल्या भुवीनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या साहिल पारखला शून्यावर तंबूत धाडत नवा विक्रम प्रस्थापित केला.

3 / 8

आयपीएलच्या इतिहासात पहिल्या षटकात सर्वाधिक २९ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय आणि ट्रेंट बोल्टनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज ठरला.

4 / 8

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टनं ३२ वेळा पहिल्या षटकात विकेट्सचा डाव साधल्याचा रेकॉर्ड आहे.

5 / 8

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं तीन षटकात तीन विकेट्स घेतल्या. यासह २०२३ नंतर पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ३२ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत त्याने ट्रेंट बोल्टच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा डावही साधला.

6 / 8

भुवनेश्वर कुमार याने पहिल्या षटकात पहिली विकेट घेतल्यावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स आणि चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलला तंबूचा रस्ता दाखवला.

7 / 8

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ८ सामन्यात १४ विकेट्स खात्यात जमा करत अनुभवी गोलंदाजाने पर्पल कॅप पटकावत आपल्या गोलंदाजीतील धार कायम असल्याचे दाखवून दिले.

8 / 8

भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटू युझवेंद्र चहल पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबीकडून खेळताना १९८ सामन्यात त्याने २१२ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सभुवनेश्वर कुमारआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग