नागपूर : परप्रांतातील मुलामुलींसह शेकडो कामगारांना कामावर जुंपायचे. नियमांना तिलांजली देऊन त्यांच्याकडून तासन् तास काम करवून घ्यायचे. हे करतानाच ना त्यांच्या कामाची नोंद न कुणाचे कागदपत्र. एवढेच काय, अनेकांचे पोलिस व्हेरिफिकेशनही केले जात नसल्याची धक्कादायक बाब सोमवारी पहाटेपर्यंत चाललेल्या छापा कारवाई आणि चाैकशीतून उजेडात आली आहे.
जिल्हा बालसंरक्षण विभाग आणि पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रविवार, २६ एप्रिलला बुटीबोरी एमआयडीसीत असलेल्या नारायणा प्रोसेस फूड प्रा. लिमिटेड या कंपनीत छापा घातला. यावेळी येथे ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील बालमजुरांसह अनेक जण धोक्याच्या स्थितीत कामाला जुंपल्याचे दिसून आले. छापा कारवाई करणारे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, पाच एकरांपेक्षा जास्त आणि प्रशस्त जागेवर ही कंपनी विस्तारलेली आहे. यात बिस्कीट कुकीजसह वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन केले जाते. त्यासाठी येथे ५००वर मजूर आहेत.सायंकाळी छापा मारला तेव्हापासून मध्यरात्री एकपर्यंत कारवाई सुरू होती. बालमजूर आढळल्याने कारवाईचे गांभीर्य वाढले. यावेळीच्या प्राथमिक चाैकशीत अनेकांची कागदपत्रे, नोंद आढळली नाही. पोलिसांचे व्हेरिफिकेशनही आढळले नाही. अर्थात, कामगाराचा काही क्राइम रेकॉर्ड आहे का, तो कुठून मोठा गुन्हा करून पळून आलेला आहे का, अशी कुठलीही शहानिशा येथे होत नसल्याचे स्पष्ट झाले. दुर्दैवाने अपघात झाल्यास आणि कंपनीतील कामगाराच्या जिवाला बरेवाईट झाल्यास परस्पर प्रकरण दाबले जात असल्याचीही शंका निर्माण झाली आहे. यासंबंधाने संपर्क केला असता पोलिसांकडून चाैकशी सुरू असल्याचे उत्तर मिळाले.
रखरखते उन्ह, घाणेरडी जागा अन् टिनाचे कंपार्टमेंट -बुटीबोरी एमआयडीसीच्या फाइव्ह स्टार इंडस्ट्रीयल झोनमध्ये असलेल्या या फॅक्टरीत मजुरांच्या राहण्याची व्यवस्था फारच दयनीय आहे. घाण-कचऱ्यात कोंदट ठिकाणी मजुरांना राहावे लागते. रखरखत्या उन्हात या बिचाऱ्यांची टिनाच्या कंपार्टमेंटमध्ये व्यवस्था केली असल्याचे आढळल्याने कारवाई करणारे पथकही काही वेळेसाठी स्तंभित झाले होते. पोलिस आता या प्रकरणात किती कडक भूमिका घेतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Web Summary : Butibori MIDC factory raid reveals shocking labor law violations. Workers, including potential child laborers, lack proper documentation and police verification. Unsafe living conditions exacerbate the problem, raising concerns about worker safety and exploitation. Police investigation ongoing.
Web Summary : बुटीबोरी एमआईडीसी कारखाने के छापे में श्रम कानूनों का चौंकाने वाला उल्लंघन सामने आया। संभावित बाल श्रमिकों सहित श्रमिकों के पास उचित दस्तावेज़ और पुलिस सत्यापन का अभाव है। असुरक्षित रहने की स्थिति समस्या को बढ़ाती है, जिससे श्रमिकों की सुरक्षा और शोषण के बारे में चिंता बढ़ जाती है। पुलिस जांच जारी है।